Margao Municipality : मडगावातील आग विझविण्‍यासाठी एक लाख लिटर पाण्‍याचा वापर!

कदंब बसस्थानकाजवळील कचरा राशींना वारंवार लागणारी आग पालिकेसाठी त्रासदायक ठरत आहे.
 fire
fireGomantak Digital Team

मडगाव : आजवर सोनसोडोवर कचऱ्याला लागणारी आग ही मडगाव नगरपालिकेसाठी डोकेदुखी होती. पण ती आता कमी झाली असे वाटत असतानाच कदंब बसस्थानकाजवळील कचरा राशींना वारंवार लागणारी आग पालिकेसाठी त्रासदायक ठरत आहे.

काल शनिवारी सकाळी तेथील सुक्या कचऱ्याने पेट घेतला व अग्निशामक दलाला तेथे धाव घ्यावी लागली. सायंकाळपर्यंत दलाने तेथे लाखावर लीटर पाणी आग विझविण्यासाठी वापरले. पण तरीही आग धुमसतच होती. दलाने आग विझविण्यासाठी नगरपालिकेला मातीची व्यवस्था करण्यास सांगितले होते. पण पालिकेला त्यात यश आले नाही.

 fire
Flight To Goa: येत्या 23 मे पासून 'या' शहरातून गोव्याला थेट विमानसेवा सुरू होतेय, जाणून घ्या सविस्तर

पालिकेच्‍या सूत्रांनी सांगितले की, सोनसोडोचा विषय उच्च न्यायालयाच्या अखत्‍यारीत असल्याने पालिकेचे सारे लक्ष तेथेच केंद्रीत झाले होते. त्यामुळे कदंबकडील कचऱ्याकडे दुर्लक्ष झाले व ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सदर ठिकाणी सुका कचरा व तोही कापलेली झाडे, झुडुपे व अन्य कचरा जमला होता. त्यामुळे आगीचा जास्त भडका उडाला.

 fire
CM Pramod Sawant: म्हादई कदापि वळवू देणार नाही; स्टार महिला पुरस्कार प्रदान सोहळ्यात सावंत यांचा पुनरुच्चार

यापूर्वीही याच जागी आग भडकण्याचे प्रकार घडलेले असताना तेथे इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा का साठविला जातो, असा प्रश्न या आगीच्या धुरामुळे त्रस्त झालेल्या त्या भागांतील रहिवाशांनी उपस्‍थित केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com