Margao Hubli Railway Line: मडगाव-हुबळी लोहमार्ग दुसऱ्या दिवशीही बंदच; काही मार्ग बदलले

Goa Train: आज रात्री मार्ग खुला होण्याची शक्यता; अनेक फेऱ्या तातडीने रद्द
Goa Train: आज रात्री मार्ग खुला होण्याची शक्यता; अनेक फेऱ्या तातडीने रद्द
Railway Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मडगाव-हुबळी लोहमार्ग आज (शनिवारी) सलग दुसऱ्या दिवशीही बंद राहिला. या मार्गावर घसरलेले मालगाडीचे डबे हलविण्याचे काम सध्या सुरू आहे. लोहमार्ग उद्या (रविवारी) रात्रीपर्यंत पूर्ववत सुरू होण्याची शक्यता आहे.

दक्षिण पश्चिम रेल्वे विभागातील सोनावळी ते दूधसागरदरम्यान बोगदा क्रमांक १५ जवळ शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास कोळसा मालवाहतूक रेल्वे रुळावरून घसरल्याने रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. हुबळी येथून आणलेल्या शक्तिशाली क्रेनच्या साहाय्याने हे डबे हटविण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे लोहमार्ग अनेक ठिकाणी पूर्णतः उखडला गेल्याने तो नव्याने घालावा लागणार आहे. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकरवी तपासणी करून तो मार्ग निर्धोक झाल्याची खात्री करून घ्यावी लागणार आहे. या कामासाठी आणखी एक दिवस लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

काही फेऱ्या रद्द, काही मार्ग बदलले

या दुर्घटनेमुळे रेल्वेच्या अनेक फेऱ्या तातडीने रद्द करण्यात आल्या आहेत, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. वास्को निझामुद्दीन रेल्वे मडगाव-पनवेलमार्गे धावत असून वास्को शालीमार एक्सप्रेस हुबळीपर्यंतच धावत आहे.

Goa Train: आज रात्री मार्ग खुला होण्याची शक्यता; अनेक फेऱ्या तातडीने रद्द
Margao Railway Station: सीटी बसगाड्यांमुळे 'ट्रॅफिक जाम'; वाहनचालकांना नाहक त्रास

मदतकार्यात अनेक अडथळे; पावसाचीही आडकाठी

मालगाडीच्या डब्यांमध्ये कोळशाची भुकटी असल्याने ते बरेच जड आहेत. त्यांचे स्थलांतर करण्यात अडचण येते.

घटनास्थळी क्रेन नेण्यासाठी शुक्रवारी रात्री अथक परिश्रम केल्यानंतर लोहमार्ग तात्पुरता दुरुस्त केला.

त्यातच अरुंद जागेमुळे हलविलेले डबे कुठे ठेवावेत, हाही प्रश्न उभा ठाकला आहे.

शिवाय हा परिसर बोगद्याचा असल्याने तेथे काम करताना रेल्वेच्या पथकाला मर्यादा जाणवत आहेत.

येथे तीव्र उतार असल्याने डबे हलविताना विशेष काळजी घ्यावी लागत आहे.

पावसाच्या अधून-मधून येणाऱ्या जोरदार सरीही मदतकार्यात अडथळे निर्माण करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com