Margao News : लोहिया मैदान ऐतिहासिक स्थळ व्‍हावे...

राम मनोहर लोहिया मैदान ऐतिहासिक स्थळ म्हणून जाहीर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली
Ram Manohar lohiya maidan
Ram Manohar lohiya maidangomantak digital team
Published on
Updated on

Margao News : गोव्यात ज्या मैदानावरून गोवा मुक्ती चळवळीला खऱ्या अर्थाने सुरूवात झाली, ते मडगाव येथील राम मनोहर लोहिया मैदान ऐतिहासिक स्थळ म्हणून जाहीर करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.

लोहियांची आज २३ मार्चला ११४वी जयंत. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मडगावातील या मैदानाला गोवा स्वातंत्र्यानंतर लोहिया मैदान म्हणून घोषित करण्यात आले आणि त्यास गोव्यातील महत्वाच्या ठिकाणाचा दर्जा प्राप्त झाला. मात्र या मैदानाला अजून आवश्यक तो राजकीय दर्जा मिळालेला नाही.

काही कालावधीपासून या मैदानाच्‍या नूतनीकरणाचे आणि सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. यावरून युरी आलेमाव यांनी गोवा सरकारवर निशाणा साधला आहे. लोहियांच्या जयंतीनिमित्त त्यांची आठवण काढताना आलेमाव म्हणाले की, लोहिया मैदानाचे काम पूर्ण करण्यासाठी १५ मार्चपर्यंतची मुदत होती. पण त्या तारखेलाही या मैदानाचा ताबा पालिकेकडे न दिल्याने त्‍यांनी खंत व्यक्त केली आहे.

डॉ. राम मनोहर लोहिया यांची ११४वी जयंती आज लोहिया मैदानावर त्‍यांच्या पुतळ्याला अभिवादन करून साजरी करण्यात आली. १८ जून क्रांती दिन समितीच्या सभासदांनी लोहिया यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी समितीचे अध्यक्ष अविनाश शिरोडकर, स्वातंत्र्यसैनिक वामन प्रभुगावकर, ॲड. रामनाथ खरंगटे, विनायक मोर्डेकर, नवनाथ खांडेपारकर, डॉ. मुकुल पै रायतुरकर, चंद्रकांत खांडेपारकर, मंगेश नाईक, दीपा नार्वेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. मडगावातील राम मनोहर लोहिया हे गोव्यातील एक महत्त्‍वाचे ठिकाण आहे. त्याचे काम त्वरित पूर्ण करावे आणि त्यास महत्त्‍वपूर्ण ऐतिहासिक ठिकाण म्हणून अधिसूचित करावे.

युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Athletics Championship
DR. Ram Manohar Lohia Journey:
 80th Anniversary DR Ram Manohar Lohia
Goa Liberation Movement
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com