Goa:धोकादायक इमारतींची होणार चौकशी

अखेर मडगाव पालिकेला जाग : अहवाल तयार करण्याची अभियंत्यांना सूचना
Margao Goa Old Buildings
Margao Goa Old BuildingsDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी : मडगाव शहरात (Margao) पोर्तुगीज राजवटीत (Goa) उभारलेल्या अनेक इमारतींची स्थिती आज अत्यंत खराब झाली असून या इमारती राहाणाऱ्यांसाठी तसेच इमारतीकडून ये-जा करणाऱ्यांसाठी (Old Buildings) धोकादायक बनल्या आहेत. मडगावात हल्लीच गांधी मार्केटजवळील (Gandhi Market) कासा मिनेझिस या इमारतीचा मागचा भाग कोसळल्याने धोकादायक इमारतींचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मोडकळीस आलेल्या या इमारतींची चौकशी करण्यासाठी आता प्रशासन जागे झाले आहे. धोकादायक इमारतीसंदर्भात पूर्वीच्या पालिका मंडळाने मालक तसेच रहिवाशांना इमारत सोडण्यासाठी नोटीस बजाविली होती. परंतु संबंधितांनी अद्याप इमारत सोडलेली नाही. तसेच पूर्वीच्या मंडळाने या इमारतीच्या स्थितीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे.

Margao Goa Old Buildings
Goa: अखेर त्या मुख्याध्यापिकेची बदली...

पोर्तुगीजकालीन राजवटीत (portuguise Style Buildings) उभारलेल्या या इमारती कोसळण्याच्या मार्गावर असून त्या कोसळल्यास येथील रहिवासी तसेच जवळच्या नागरिकांच्या जीवावरही बेतू शकते. त्यामुळे प्रशासनाने या इमारतीसंबंधी योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मडगावमधील धोकादायक इमारतीसंदर्भात मडगाव पालिकेने (Margao Municipal) केलेल्या यादीत टी. बी. कुन्हा स्कूल, (T B Kunha) पॉप्युलर प्राथमिक विद्यालय, क्रुझ मेन्सन, सिने लताजवळील सुकडो इमारत, गोल्डन फोटो स्टुडिओ इमारत, संस्कार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग, गॅलेक्सी अपार्टमेंट, ग्रेसियस फुर्तादो इमारत, पेद्रो कार्दोझ इमारत, विल्हा कुतिन्हो इमारत, होली स्पिरिट चर्चजवळील कुलासो निवासस्थान, रेल्वे गेटजवळील लोटलीकर इमारत, चिंचाल येथील परिश्रम रायकर आणि लाडू रायकर यांची इमारत, तिळवे इमारत यांचा समावेश आहे.

Margao Goa Old Buildings
Goa: काय आहे 'तिच्या' मृत्यू मागचे गूढ?

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com