मडगावला मिळाले 'वसुली' वाहन

वसुलीला चालना: मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांचा विश्‍वास
Margao Municipality
Margao MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मडगाव पालिकेने दहा लाख रुपये खर्चून घेतलेल्या नव्या कोऱ्या वसुली वाहनामुळे पालिकेच्या थकबाकी वसुलीला नवी चालना मिळणार आहे. मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनीच तशी खात्री व्यक्त केली असून लोकांनी तसेच व्यापारी आस्थापनांनी स्वतःहून थकबाकी चुकती करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही केले आहे.

नगरपालिका चौकात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी या वाहनाची पूजा केली व ते पालिकेच्या वाहन ताफ्यात दाखल करून घेतले. यावेळी उपनगराध्यक्ष दीपाली सावळ, मुख्याधिकारी फर्नांडिस व नगरसेवक उपस्थित होते.

Margao Municipality
Goa Updates: जन आरोग्य योजनेच्या लाभार्थींचा सन्मान

नगराध्यक्ष लिंडन परेरा म्हणाले, की अशीच आणखी एक इलेक्ट्रीक व्हॅन पालिका घेणार असून त्यामुळे पालिकेच्या कामात आणखी नियमितपणा येईल. वसुली तसेच अतिक्रमणविरोधी मोहिमेत असे वाहन नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. त्या या व्हॅनमुळे दूर होणार आहेत.

मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस म्हणाले, की पालिकेकडे आता खास वसुली अधिकारी तसेच व्हॅन आली असून त्यामुळे 25 कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी जास्त भर दिला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Ganesh Chaturthi Celebration 2026
Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com