Illegal Cables: वीज खांबांवरच्या केबल्स रस्त्यांवर! कारवाईनंतर वेगळीच समस्या; वाहनचालक, पादचाऱ्यांसाठी अडचण

Goa Illegal Cabels On Pole: वीज खांबांवर लटकवलेले टीव्ही चॅनल व अन्य केबल न्यायालयाच्या निर्देशावरून हटविण्याची कारवाई वीज खात्याने सुरू केली आहे.
Illegal Cable Issue Maragao Fatorda
Illegal Cable Issue Maragao FatordaDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: वीज खांबांवर लटकवलेले टीव्ही चॅनल व अन्य केबल न्यायालयाच्या निर्देशावरून हटविण्याची कारवाई वीज खात्याने सुरू केली आहे. दरम्यान, वीज खांबांवरून हटविलेले हे केबल जमिनीवर लोळण घेत असल्याने आता एक नवी समस्या निर्माण झाली आहे.

या केबलमुळे रस्त्यावर किंवा फुटपाथवर चालणे कठीण होत आहे. त्यामुळे हे केबल त्वरित हटवावेत अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.

केबल टीव्हीच्या मालकांनी एका घरातून दुसऱ्या घराला जोडणी देण्यासाठी केबल बेकायदा वीज खांबाला लटकवले होते. याला याचिकेव्दारे आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने खांबावरील केबल हटविण्याचे निर्देश वीज खात्याला दिले.

त्यानुसार खात्याने आपली कारवाई सुरू केली आहे. परंतु खांबावरील हटविलेले हे केबल खांबाखालीच टाकून दिल्याने येथून चालत जाणाऱ्यांसाठी समस्या निर्माण होते.

Illegal Cable Issue Maragao Fatorda
Illegal Paragliding: 30 दिवसांत एक लाख दंड भरा अन्यथा...; अवैध पॅराग्लायडिंगप्रकरणी पर्यटन खात्याची कारवाई

त्वरित हटवा

मडगाव व फातोर्डा परिसरात अनेक ठिकाणी खांबांवरून हटविलेले केबल जमिनीवर लोळण घेताना दिसत आहेत. काही ठिकाणी आडोशाला गुंडाळून ठेवले आहेत तर काही ठिकाणी रस्त्याचा कडेला व फुटपाथवर टाकण्यात आले आहेत. हे केबल वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी अडथळ्याचे बनलेले आहेत. हे सर्व केबल हटवावेत अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. दरम्यान, वीज विभागातर्फे गंज लागलेले खांब हटवून त्‍या ठिकाणी नवे खांब बसविण्याचे काम मडगाव व फातोर्डा परिसरात सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com