मडगाव न्यायालयात पुन्हा गळती; आणखी तीन कोर्ट हलविणार

मडगाव प्रथम वर्ग न्यायालयाच्या जुन्या इमारतीत मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्‍या कक्षात पावसाचे पाणी थेट आत येऊ लागल्याने न्यायाधीशांसह सर्वांची तारांबळ उडाली.
मडगाव न्यायालयात पुन्हा गळती
मडगाव न्यायालयात पुन्हा गळतीDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मडगाव प्रथम वर्ग न्यायालयाच्या जुन्या इमारतीत मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांच्‍या कक्षात पावसाचे पाणी थेट आत येऊ लागल्याने न्यायाधीशांसह सर्वांची तारांबळ उडाली. आज दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू झाला आणि कौलांवर घातलेले ताडपत्रीचे आवरण उडून गेल्याने पाण्याच्या धारा न्यायकक्षात पडू लागल्या. यावेळी साक्षीपुरावे नोंदविणे चालू होते.

(margao court leaks again Three more courts will be moved)

मडगाव न्यायालयात पुन्हा गळती
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मते फुटणार?

या न्यायकक्षात पाणी भरण्यासाठी बादल्या आणून ठेवल्याने हे न्यायालय की आणखी काही, असा संभ्रम निर्माण झाला. शेवटी पाऊस थोडा ओसारल्यावर अग्निशमन दलाची गाडी बोलावून छपरावर असलेल्या ताडपत्रीचे आवरण काढून टाकले. यापूर्वी या जुन्या इमारतीतील दोन कोर्ट सत्र न्यायालयीन इमारतीत हलविण्यात आले होते. आता सोमवारपासून आणखी तीन कोर्ट दुसरीकडे हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

मडगाव न्यायालयाची ही इमारत पोर्तुगीजकालीन असून तिचे छप्पर कमकुवत झाल्याने पावसाचे पाणी आत येऊन साचू लागल्याने काही दिवसांपूर्वी मडगावच्या वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार घालून नाराजी व्यक्त केली होती. पण नंतर त्यांची समजूत घालून या इमारतीतील दोन कोर्ट दुसरीकडे हलविले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com