Margao Corporation Building : मडगाव पालिका इमारत दुरुस्ती करा;पोर्तुगीजकालीन प्रशासकीय इमारत जीर्ण

Margao Corporation Building : न्यू मार्केट, गांधी मार्केट संकुल, या सर्व परिस्थितीबद्दल बोलताना शॅडो कौन्सिलचे निमंत्रक व काँग्रेस नेते सावियो कुतिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, न्यू मार्केट इमारत, गांधी मार्केट संकुल व नगरपालिका प्रशासकीय इमारतीला पावसाळ्यापूर्वी संरक्षण मिळावे यासाठी त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
Margao Corporation Building
Margao Corporation BuildingDainik Gomantak

Margao Corporation Building :

सासष्टी, मडगाव नगरपालिकेकडे तीन महत्वाच्या इमारती आहेत. त्यात भव्य अशी न्यू मार्केट इमारत, गांधी मार्केट संकुल व पोर्तुगीजकालीन प्रशासकीय इमारत. या तिन्ही इमारतींची अवस्था बिकट असून त्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी मडगाववासीय करीत आहेत.

प्रशासकीय इमारतीचे काँक्रीटचे तुकडेच खाली पडत आहेत. पावसाळ्यात पाणी आत येत असते व त्यामुळे कागदपत्रे तसेच महत्त्‍वाच्‍या फाईल्‍स भिजतात. सध्‍या तर फाईल्‍स, कागदपत्रे जमिनीवर ठेवलेली दिसतात.

या सर्व परिस्थितीबद्दल बोलताना शॅडो कौन्सिलचे निमंत्रक व काँग्रेस नेते सावियो कुतिन्हो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, न्यू मार्केट इमारत, गांधी मार्केट संकुल व नगरपालिका प्रशासकीय इमारतीला पावसाळ्यापूर्वी संरक्षण मिळावे यासाठी त्वरित दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

Margao Corporation Building
Goa River: राज्यातील सहा नदीपट्टे प्रदूषित; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलस्रोतांची पाहणी

इमारतीच्या खिडक्या उघड्याच असतात. त्यामुळे त्यातून पाणी आत येत असते. प्रशासनाने इमारतीसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्‍‍यक आहे.

दोनच दिवसांपूर्वी मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर यांनी सांगितले होते की, इमारतीच्या छपराच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे व ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाईल. त्याचप्रमाणे इमारतीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव जीएसआयडीसीकडे आहे.

Margao Corporation Building
Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

न्यू मार्केट व्यापारी संघटना चुकीच्या माणसांच्या हाती आहे. ही सर्व माणसे आमदाराच्या हातातील बाहुले असल्याने त्यांना पाहिजे तशी दुरुस्ती किवा नूतनीकरण करता येत नाही. न्यू मार्केट व प्रशासकीय इमारतीच्या छप्पराची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या इमारतींना रंगरंगोटी केल्यास किती तरी वर्षे झाली असतील.

- सावियो कुतिन्हो, शॅडो कौन्सिलचे निमंत्रक

मडगाव नगरपालिकेची झालेली स्थिती बिकट व दुर्दैवी आहे. ती पाहून मनापासून वाईट वाटते. नगरपालिकेत कित्येक विभाग आहेत. मात्र एकही विभाग पाहिजे तसा क्रियाशील नाही. कागदोपत्री अनेक ठराव आहेत. ते सरकारकडे पाठविल्याचे सांगितले जाते. मात्र त्यातून निष्पन्न काहीच होत नाही.

- केतन कुरतरकर, माजी नगरसेवक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com