Margao Corporation : मडगाव उद्यान बेघरांचा अड्डा! अनैतिक कृत्‍यांना वाव

Margao Corporation : भांडणे, हाणामारीचे प्रकार; कोविड महामारीच्या काळात परिसरातील दोन मृत भिकारी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर सर्व बेघर आणि भिकाऱ्यांना निवारागृहात ठेवावे, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती.
Margao Corporation
Margao CorporationDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Corporation :

मडगाव नगरपालिकेच्या उद्यानाच्या आतील व सभोवतालील बाकांवर तसेच तेथे जमिनीवर रात्रंदिवस झोपा काढणारे बेघर आहेत की भिकारी, याबाबत स्पष्टता नसली तरी शहरी भागातील केंद्रस्थानी असलेल्या या जागेवर कब्जा केलेल्या या बेघरांच्या गटांमध्ये भांडणे, मारामाऱ्यांचे प्रकार वाढले आहेत.

तरीही त्यांच्यावर पोलिस, पालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचा बडगा का उगारला जात नाही? हा प्रश्‍‍न ऐरणीवर आला आहे.

स्थानिकांच्या दाव्यानुसार, पालिका उद्यानाच्या पदपथावर अशा बेघरांच्या गटांमध्ये होणाऱ्या मारामाऱ्या आणि भांडणाशिवाय एकही दिवस जात नसतो. हे उद्यान म्‍हणजे एकेकाळी मडगावकरांचे संध्याकाळचा वेळ घालवण्याचे चांगले ठिकाण होते.

Margao Corporation
Goa Politics: दक्षिण गोव्यासाठी चोडणकरांची मोर्चेबांधणी

बेघर व्यक्तींना सरकारी मालकीच्या जागेतून हलविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही पावले उचललेली नाहीत किंवा जिल्हा पोलिस वा मडगाव पोलिसांकडून त्यासाठी हालचालीही दिसत नाहीत. सदर उद्यान या लोकांपासून मुक्त करावे, अशी मागणी मडगावकरांकडून केली जात आहे.

कोविड महामारीच्या काळात परिसरातील दोन मृत भिकारी कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यानंतर सर्व बेघर आणि भिकाऱ्यांना निवारागृहात ठेवावे, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र नंतर यासंदर्भात काहीच हालचाली दिसून आल्‍या नाहीत.

Margao Corporation
Goa News: नौसेनेची ताकद वर्चस्वासाठी नसून शांततेसाठी...

दरम्‍यान, आता तरी या लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

भिकाऱ्यांवर कारवाई करावी : सगुण नाईक

शहरातील रस्त्यांवर गर्दी करणाऱ्या भिकाऱ्यांवर कारवाई करून प्रशासनाने शहर स्वच्छ करावे. पालिका उद्यानाच्या पदपथावर किंवा शहरात इतरत्र आढळणारे सर्वच स्थलांतरित आणि बेघर हे भिकारी नसतात, तर त्यांपैकी काही समाजविघातक कृत्ये करणारेही असू शकतात.

त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे पुनर्वसन करणारी मोहीम राबविण्याची गरज नगरसेवक सगुण ऊर्फ दादा नाईक यांनी व्यक्त केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com