Goa News: नौसेनेची ताकद वर्चस्वासाठी नसून शांततेसाठी...

Goa News: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह: कारवारमधील नौसेना युद्ध महाविद्यालयाचे गोव्यातून राष्ट्रार्पण
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News:

गुलामीची मानसिकता झटकून भारतीय संस्कृती आणि समृद्ध वारशाला भारतीय नौसेनेत प्राधान्य देण्यात येते. समुद्रातून व्यापारही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारतीय नौसेना दिवसेंदिवस प्रगती करत आहे.

सशक्त होत आहे, परंतु त्याचा हेतू वर्चस्व गाजविण्याचा नसून तर समुद्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. वेरे-बेती येथील ‘चोला’ नामक नौसेना युद्ध महाविद्यालयाच्या राष्ट्रार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नौसेना प्रमुख आर. हरी कुमार, केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.

Goa News
Anjuna Beach: हणजूण किनारपट्टीतील 114 आस्थापनांना टाळे

कारवार तळावरील प्रकल्पांचे अनावरण

1 संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आभासी पद्धतीने कारवारच्या नौदल तळावरील सीबर्ड प्रकल्पाचा एक भाग असलेल्या काही प्रकल्पांचे अनावरण केले.

2 या प्रकल्पात 10 हजार गणवेशधारी आणि नागरी कर्मचारी कुटुंबासह राहण्याची सोय आहे. ज्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि औद्योगिक वाढीला लक्षणीय चालना मिळणार आहे.

3 नेव्हल एअर स्टेशन उत्तर कर्नाटक आणि दक्षिण गोव्यात पर्यटन वाढवेल अशी अपेक्षा आहे. प्रकल्पाच्या बांधकामामुळे 7 हजार प्रत्यक्ष आणि २० हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण झाला आहे. हा प्रकल्प ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत होत असून यासाठीचे ९० टक्के साहित्य हे देशातीलच वापरण्यात येत आहे.

हिंद महासागरातील सर्व शेजारी राष्ट्रांना त्यांची स्वायत्तता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी भारताकडून मदतीचे प्रयत्न केले जात आहेत. आपल्या सागरी शेजारी देशांसोबत आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य मजबूत करण्यासाठी कार्य करण्याची भारताची वचनबद्धता कायम राहील.

- राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com