Online Fraud: तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तब्बल 1.97 लाखांचा ऑनलाईन गंडा, पोलीस स्थानकात गुन्हा नोंद

मुरगाव, कुंकळ्ळी आणि काणकोण पोलिस स्थानकांत गुन्हा नोंद
Online Frauds
Online FraudsDainik Gomantak
Published on
Updated on

ऑनलाईन सेवेच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तब्बल 1.97 लाखांचा गंडा घातल्याची घटना गोव्यात घडली आहे. या प्रकरणी मुरगाव, कुंकळ्ळी आणि काणकोण पोलिस स्थानकांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पहिली घटना बोगदा वास्को येथील लीना फर्नांडीस यांच्याशी घडली असून त्यांना ९९ हजारांचा फटका बसला. नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास तिला एक फोन आला. त्यात एका अज्ञात माणसाने त्या महिलेला फोन करून आपण कुरियर बॉय असल्याचे तिला सांगितले.

तुम्हाला एक पार्सल आले आहे. ते कसे मिळवायचे यासाठी तुमच्या फोनवर एक लिंक पाठविली आहे. ती उघडा आणि त्यात दिलेल्या सूचनांचे पालन करा असे सांगण्यात आले. त्या महिलेने त्या प्रमाणे लिंक क्लिक केली असता तिच्या अकाऊंट मधून 99 हजार रूपये काढले गेले.

दुसरी घटना काणकोण येथे घडली. येथील मनोज पागी याला इलेट्रिक स्कूटर विकण्याच्या बहाण्याने 40 हजार रुपयांचा गंडा घातला तर कुंकळी येथील एका इसमाला अधीक परतावा देण्याच्या बहाण्याने 59 हजार ऑनलाईन पद्धतीने गुंतवणूक करण्यास लावून लुबडण्यात आले. या प्रकरणी संबंधीत पोलीस स्थानकावर गून्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa 72 Panchayats Online Payment
Goa Online Financial Fraud
 Goa Facebook Part Time Job Scam
 Goa Online Investment Fraud
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com