PM Narendra Modi Goa Visit: मोदींच्या गोवा दौऱ्यामुळे मडगाव बसस्थानकाला नवसंजीवनी!

मडगाव बसस्थानकाच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
PM Narendra Modi Goa Visit
PM Narendra Modi Goa Visit
Published on
Updated on

बेतुलमधील एनर्जी वीक कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी 06 फेब्रुवारीला गोव्यात येणार आहेत. यावेळी मडगावमध्ये त्यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मडगाव बसस्थानकाला नवे रूप मिळणार आहे.

PM Narendra Modi Goa Visit
Goa Updates 27 January 2024: राज्यातील दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

गेल्या काही वर्षांपासून स्थानकाची अत्यंत दयनीय स्थिती आहे. स्थानकावरील रस्ता वाईट अवस्थेत जैसे थे आहे. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यामुळे हे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मडगाव बसस्थानकाच्या मैदानावर मोदींची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. यामुळे बसस्थानकावर आजपासून (27 जानेवारी) डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच तिथे सध्या नवे स्वच्छतागृहही बसवण्यात आले. यासाठी स्थानकावरील बसेस दुसरीकडे हलवण्यात आल्या आहेत.

आंतरराज्य बसेस आधीच SGPDA पार्किंग ग्राउंडवर हलवण्यात आल्या आहेत. तर कदंब बसेस जलतरण तलावाजवळील क्रीडा प्राधिकरण मैदानावर हलवण्यात येणार आहेत. दरम्यान, स्थानक परिसरातील दुकान मालकांना 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीपर्यंत आपली दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. उद्यापासून व्यासपीठाचे काम सुरू होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com