Goa Updates 27 January 2024: राज्यातील दिवसभरातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

Goa Breaking News: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील इतर महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज
Goa Live Updates 27 January 2024
Goa Live Updates 27 January 2024Dainik Gomantak

मॉडेल मुनमुन धमेचाला न्यायालयाने दिली 'ही' परवानगी

मुंबईतील विशेष न्यायालयाने 2021 च्या कॉर्डेलिया क्रूझ अमली पदार्थ प्रकरणातील आरोपी मॉडेल मुनमुन धमेचाला फोटोशूटसाठी थायलंडला जाण्याची परवानगी दिली आहे.

मुनमुनला ऑक्टोबर 2021 मध्ये बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतरांसह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मुंबई समुद्रकिनाऱ्याजवळील क्रूझवर छापा टाकल्यानंतर अटक करण्यात आली होती.

महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाने वन नेशन वन इलेक्शनचे केले समर्थन

देशात मागील बऱ्याच काळापासून एक राष्ट्र एक निवडणूक (One Nation One Election) घेण्याची मागणी केली जात आहे. भाजपचे अनेक नेते याच्या समर्थनात असून, आता गोव्यातील महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाने वन नेशन वन इलेक्शनचे समर्थन केले आहे.

वागातोर किनाऱ्यावरील बेकायदेशीर बांधकाम जमीनदोस्त;

काही दिवसांपासून किनारीभागातील बेकायदेशीर बांधकामाविरुद्ध पर्यटन खात्यासह सीआरझेडनेही कारवाई सुरु केली असून आज वागातोर समुद्र किनारी बेकायदेशीर बांधकामांविरोधात कारवाई केल्याचे समजतेय.

गोवा काँग्रेस आणि भाजपमध्ये 'तिरंगा वॉर'

काँग्रेसला देशापेक्षा पक्ष आणि गांधी परिवार महत्वाचे असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर गोवा काँग्रेसने प्रमोद सावंत आणि भाजपला प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेस भवन इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पक्षाचा झेंडा खूप दिवसांपासून लावण्यात आला आहे. 26 जानेवारी 2024 रोजी आम्ही पक्षाचा ध्वज फडकावला नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसने प्रसिद्धपत्रकाद्वारे दिले आहे.

खेलो इंडिया यूथ गेम्स: गोव्याच्या आरिफला ब्राँझ

तमिळनाडूत झालेल्या सहाव्या खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये गोव्याच्या आरिफ खान याला पारंपरिक योगासन क्रीडा प्रकारात ब्राँझपदक.

आशिष सूद गोवा भाजप निवडणूक प्रभारी!

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक प्रभारी आणि सह-निवडणूक प्रभारी निवडले आहेत. गोव्यासाठी आशिष सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वाळपई फोंडा मार्गावर वाहतूक कोंडी

वाळपई फोंडा मार्गावर नाणूस येथे वीज केबल‌ टाकण्यासाठी रस्ता खोदल्यामुळे वाहतूक कोंडी. वाहनांना बाजू दाखवण्यासाठी कंत्राटदाचा माणूस गैरहजर

'रोमियो लेक' च्या अवैध बांधकामावर कारवाई

रॉबर्ट कुतिन्हो व आंतोनियो डिसोझा यांच्या 'रोमियो लेक' या शॅकचे अवैध बांधकाम आज पर्यटन खात्याकडून पाडण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार आज ही कारवाई करण्यात आली.

गांधी मार्केटमध्ये 3 वर्षांची अज्ञात मुलगी सापडली!

मडगावातील गांधी मार्केट येथे 3 वर्षांची अज्ञात मुलगी सापडली. पोलिसांनी मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी नेले आहे. अद्याप दक्षिण गोव्यातील कोणत्याच पोलीस स्थानकात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल झालेली नाही. पालकांचा शोध घेणे सुरू आहे.

रणजी करंडक: पंजाबला पहिल्या डावात आघाडी

रणजी करंडक क्रिकेट सामन्यात पर्वरी येथे गोव्याच्या सर्वबाद १०४ धावांना उत्तर देताना पंजाबच्या पहिल्या डावात सर्वबाद १९० धावा, ८६ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी.

विजय सरदेसाई भाजपात जाणार ही अफवा!

विजय सरदेसाई भाजपमध्ये सामील होणार असल्याची अफवा कुणीतरी पसरवत आहे. आम्ही भाजपात सामील होणार नसून, गोवेकरांचे प्रश्न मांडण्यासाठी आगामी विधानसभा अधिवेशनाची तयारी करत आहोत. गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांची माहिती

डिचोली शहर 'नाणीज'मय!

डिचोली शहर 'नाणीज'मय. जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ नाणीज धामच्या पादुका दर्शन सोहळ्याचा उत्साह. शेकडो शिष्यगणांची उपस्थिती.

कार्ला गावात अद्यापही योग्य रस्ता नसल्याने नागरिक त्रस्त

सांगे येथील कार्ला गावात अद्यापही योग्य रस्ता नसल्याने नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावात 100% लोक अनुसूचित जमातीचे आहेत आणि सुमारे 200 आणि त्याहून अधिक लोक गावात राहतात. जर एखाद्याला किरकोळ सर्दी किंवा ताप आला तर केपे आरोग्य केंद्रात 35 किमी प्रवास करावा लागतो.

अरविंद केजरीवालांची उच्च न्यायालयात धाव! आचारसंहिता उल्लंघन प्रकरणी कारवाईला दिले आव्हान...

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी म्हापसा न्यायालयात सुरू असलेल्या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 2017मध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेवेळी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आले होते.

उत्तर गोवा-पणजीतील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजच्या किमती

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com