Margao Bus Stand: ...आणि रिक्षाचालकांनीच बुजवले बसस्थानकाजवळील खड्डे!

मडगावातील जुन्या बसस्थानकाजवळील खड्ड्यांमुळे चालकांना वाहतुकीस अडथळा
Margao Bus Stand Road Damaged
Margao Bus Stand Road DamagedDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Bus Stand Road Damaged: मडगावातील जुन्या बसस्थानकाजवळील खड्ड्यांमुळे चालकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर चक्क रिक्षाचालकांनी रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीचे काम केले.

अनेकदा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सांगून देखील याबाबत कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने स्वत: रिक्षाचालकांनीच हे काम केल्याचे सांगितले.

Margao Bus Stand Road Damaged
Goa Update: गोव्यातील दिवसभराच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

माहितीनुसार, मडगाव स्थानकाजवळील पार्किंगसाठी निश्‍चित केलेली जागा खराब अवस्थेत आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही काहीच उपयोग झाला नाही.

मडगावातील, सबीना रेस्टॉरंटजवळील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर मोठमोठे खड्डे पडल्याने रिक्षा व बसेसचे नुकसान झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. खड्ड्यांमुळे आमची वाहने खराब होत आहेत. शेवटी संतप्त चालकांनी आपण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पैसे देणार असल्याचेही सांगितले.

मडगाव जुने बसस्थानक गेल्या अनेक वर्षांपासून या दुरुस्तीच्या कामांमुळे चर्चेत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com