Goa Live Update 04 December 2023
Goa Live Update 04 December 2023Dainik Gomantak

Goa Update: गोव्यातील दिवसभराच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

'सनबर्न'वाले सरकारचे जावई आहेत का? - आ. विजय सरदेसाई
Published on

सनबर्न वाले सरकारचे जावई आहेत का? - आ. विजय सरदेसाई

मुख्यमंत्री म्हणतात की ३१ डिसेंबर दिवशी सनबर्न नसेल. पण मग, तरीही ३१ डिसेंबरच्या सनबर्नच्या तिकिटांची विक्री कशी केली जात आहे सनबर्नवाले सरकारी जावई आहेत का?, असा सवाल गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष, फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.

साखळी अर्बनच्या नवीन इमारतीचे ६ डिसेबर रोजी उद्घाटन

गोव्यात १९९० साली सर्वप्रथम स्थापन झालेल्या दि साखळी अर्बन सहकारी पतसंस्थेच्या उभारण्यात आलेल्या नवीन प्रशस्त इमारतीचे उदघाटन बुधवार दिनांक ६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे.

या सोहळ्यास सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, गोवा सहकार निबंधक मेन्युअल बार्रेटो, साखळीच्या नगराध्यक्षा रश्मी देसाई उपस्थिती असतील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अनिल काणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

J P Nadda | Sadanand Shet Tanavade
J P Nadda | Sadanand Shet Tanavade Dainik Gomamtak

खासदार तानावडे यांनी घेतली जे. पी. नड्डांची भेट 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सोमवारी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. पक्ष विस्ताराबाबत यावेळी चर्चा झाल्याचे तानावडे यांनी सांगितले.

राज्यातील आणखी 2 मंत्र्यांना मंत्रीमंडळातून मिळणार डच्चू? दक्षिण गोव्यातील दोघांना मिळणार संधी...

देशातील तीन प्रमुख राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करून गोव्यात पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रीमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेषत: दक्षिण गोव्यातील लोकसभेची जागा जिंकण्यासाठी, भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. दक्षिण गोव्यात काँग्रेसचा खासदार आहे. ही गोष्ट भाजपच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना खुपते.

यापुर्वी फोंड्यातील सभेतून या जागेवर भाजपचा उमेदवार निवडून येण्यासाठी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी रणशिंग फुंकले होते.

लोकांना नको तर सनबर्न नाही!

३१ डिसेंबरला सनबर्न नको असं आमदार डिलायला लोबोंनी सांगितलं आहे कारण लोकांची तशी मागणी आहे. जर लोकांना नको तर सनर्बन ३१ डिसेंबर रोजी करणार नाही. मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती.

आमदार अपात्रता याचिका! प्रतिवादी आमदारांना दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

आमदार अपात्रता याचिकाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यात प्रतिवादी आमदारांना दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गिरीश चोडणकर या प्रकरणी याचिका दाखल केली होती.

श्रीपाद भाऊंनी आता विश्रांती घ्यावी, मी लोकसभा लढविण्यास तयार - दयानंद सोपटे

पक्षाने मला संधी दिल्यास मी निवडणूक लढण्यास तयार आहे. मला उत्तर गोवा मतदारसंघ नवा नाही. श्रीपाद भाऊंनी गेली 40 वर्षे गोव्यासह देशाची सेवा केलेली आहे.

आता सगळ्यांनाच वाटतं की श्रीपाद भाऊंना विश्रांतीची गरज आहे. श्रीपाद भाऊंनी नव्या दमाच्या नेत्यांना संधी देण्याची गरज आहे असे वक्तव्य मांद्रेचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी केले आहे.

मडगाव रेल्वे स्थानकावर टॅक्सी चालकाला मारहाण, तणावपूर्ण परिस्थिती, पोलीस घटनास्थळी

मडगाव रेल्वे स्थानकावर टोल कर्मचाऱ्याकडून टॅक्सी चालकाला मारहाण करण्यात आली आहे. यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून, घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.

कारचालकाच्या अमली पदार्थ चाचणीतही काही नाही सापडले, वागातोर अपघात प्रकरण

वागातोर येथील अपघातात एका रिसॉर्टच्या मालकीणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील अटक संशयित कारचालक सचिन कुरुप (42, आसगाव, मूळ-पुणे) याच्या मद्य चाचणीनंतर आता अमली पदार्थ चाचणी देखील निल आली आहे.

'मी लोकसभा उमेदवारीच्या शर्यतीत' - एल्विस गोम्स

राहूल गांधींच्या निमंत्रणावरुन मी काँग्रेस पक्षात सामिल झालो असून, मी लोकसभा उमेदवारीच्या शर्यतीत आहे, असे नेते एल्विस गोम्स म्हणाले.

जुने गोवेत आज सेंट झेवियर फेस्त

जुने गोवे येथे आज (सोमवारी) सेंट फ्रान्सिस झेवियर फेस्त साजरा होत आहे. दरवर्षी 3 डिसेंबरला फेस्त साजरा होत असतो पण, यावेळी रविवार आल्याने सोमवारी फेस्त होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com