Margao Crime : बेरोजगार युवतीची ४.७४ लाखांची फसवणूक

Margao Crime : न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर गुन्हा नोंद
crime
crimeDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Crime :

मडगाव, विदेशात कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवत फ्रान्सिस बार्रेटो, अविटा बार्रेटो व पीटर फर्नांडिस यांनी ४.७४ लाख रुपये घेतले. नोकरी दिली नाही व पैसेही परत दिले नाहीत. याप्रकरणी दीपाली सिरसाट यांनी तक्रार केल्यानंतर फातोर्डा पोलिसांकडून तिन्ही संशयितांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याप्रकरणी सिरसाट यांनी ऑक्‍टोबर २०२३ मध्‍ये तक्रार दिली होती; पण ती पोलिसांनी नाेंदवून न घेतल्‍याने त्‍यांनी मडगाव न्‍यायालयात धाव घेतली. ही तक्रार नोंदवून घ्‍यावी, असा मडगाव न्‍यायालयाने आदेश दिल्‍यानंतर तब्‍बल ९ महिन्‍यांनी फातोर्डा पोलिसांनी संशयितांवर गुन्‍हा नाेंद केला.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित फ्रान्सिस बेंजामिन बार्रेटो, अविटा बार्रेटो (दोन्ही रा. शिरोडा, फोंडा) व फातोर्डा-मडगाव येथील पीटर जॉन फर्नांडिस यांनी मुरिडा फातोर्डा येथील रहिवासी दीपाली कपिल सिरसाट यांच्या मडगावातील फिटनेस स्पेस येथे भेटत अमेरिका येथील केमन आयलंड्स याठिकाणी कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवले. दीपाली यांच्याकडून यूपीआयद्वारे ३.७४ लाखांची रक्कम घेतली तर १ लाख रुपये रोख रक्कम घेतली.

crime
Goa Power Tariff Hike: गोमंतकीयांच्या खिशाला झळ बसणार, रविवारपासून वीज दरवाढीचा शॉक

नोकरीसाठी पैशांचा व्यवहार २४ डिसेंबर २०२२ मध्ये करण्यात आला. मात्र, त्यानंतर फ्रान्सिस याने तात्पुरते काम असलेले बनावट फॉर्म आणून दिले. तिन्ही संशयितांना दीपाली यांना विदेशात नोकरी देणे शक्य झालेले नाही. या घटनेला दोन वर्षे झाल्याने दीपाली यांनी पैसे परत करण्यास सांगितल्यावर तिघांनी पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे दीपाली सिरसाट यांनी फातोर्डा पोलिसांत तक्रार केली. फातोर्डा पोलिसांकडून आर्थिक फसवणूकप्रकरणी तिन्ही संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला.

पोलिसांकडून दिरंगाई

वास्‍तविक सिरसाट यांनी ऑक्‍टोबर २०२३ मध्‍ये फातोर्डा पोलिस स्‍थानकात यासंदर्भात तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी कुणावरही एफआयआर नोंद केला नाही. त्‍यामुळे एफआयआर नाेंद करण्‍यासाठी त्‍यांनी मडगाव न्‍यायालयात धाव घेतली. मडगाव न्‍यायालयाने त्‍यांची बाजू ऐकून घेत याप्रकरणी पोलिसांनी त्‍वरित गुन्‍हा नोंद करावा, असा आदेेश दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com