
गोवा पोलिसांच्या ANC ने गोवा चेक पोस्टच्या आत काही मीटर अंतरावर पत्रादेवी येथे एक मोठा अंमली पदार्थ छापा टाकला. अटक आरोपी, परवेज अली खान (३० कुडाळ, सिंधुदुर्ग) याला ANC च्या गुप्तहेरांनी पकडले आणि त्याच्याकडून तब्बल 208 ग्रॅम एक्स्टसी पावडर आणि 43 अत्यंत शक्तिशाली एक्स्टसी गोळ्या जप्त केल्या आहेत ज्यांची किंमत अंदाजे W/25,00-10, आंतरराष्ट्रीय आहे.
गोवा काँग्रेस सेवा दलाने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी ध्वजारोहण करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने, गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर माजी केंद्रीय कायदा मंत्री ॲड. रमाकांत खलप यांच्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.
सावईवेरेतील सरदेसाईंच्या वाड्यावर गुढीपाडवा संपन्न. विजय सरदेसाई, उषा विजय सरदेसाई, मंदार सरदेसाई, संजीव सरदेसाई व यांच्या हजेरीत व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गुढीपाडवा.
आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर वाळपई नूतन भाजपा मंडळ समिती जाहीर
डिचोलीतील हाऊसिंग बोर्ड परिसरात घरगुती नळांद्वारे गढूळ पाणी पुरवठा. समस्येने ग्राहक हैराण.
मान्य असेल तर थांबा अन्यथा आताच दूर व्हा. प्रियोळातील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे जाहीर विधान.प्रियोळ मतदारसंघात कमळ फुलणारच, मुख्यमंत्र्यांचा एल्गार.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या हाऊसिंगबोर्ड साखळी येथील निवासस्थानी पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह विधीवतपणे पूजा करून गुढी उभारली. घरावरील गुढी हे कौटुंबिक सुख समृध्दीचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी म्हटले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.