मराठी साहित्य सांस्‍कृतिक संमेलन पार पडले उत्साहात

श्री दत्त मंदिराच्या सभामंडपात संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
मराठी साहित्य संमेलन
मराठी साहित्य संमेलनDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: गोवा मराठी अकादमीच्या सत्तरी तालुका विभागातर्फे पाली-सत्तरी येथे आयोजित मराठी साहित्य सांस्‍कृतिक संमेलन रविवारी दिवसभर उत्साहात पार पडले. श्रीदत्त मंदिराच्या सभामंडपात संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मराठीप्रेमींची उपस्थिती होती.

उद्घाटनाला व्यासपीठावर प्रसिद्ध साहित्‍यिक डॉ. विनोद गायकवाड (बेळगाव), पत्रकार पांडुरंग गावकर, माजी मुख्याध्यापक बाबुसो गावकर, माजी उपसभापती तथा वाळपईचे माजी आमदार व स्वागताध्यक्ष नरहरी हळदणकर, गोवा मराठी अकादमीचे संचालक आनंद मयेकर, तालुका समितीचे सचिव रामकृष्ण गावस, मराठी साहित्य सांस्कृतिक संमेलनाचे कार्याध्यक्ष रामनाथ खोत, सचिव रोहिदास गावकर, श्रीदत्त मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष देविदास सावंत, चंद्रकांत गावस आदींची उपस्थिती होती.

मराठी साहित्य संमेलन
ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या परदेशी व्यक्तीला तब्बल 7 वर्षांनंतर मिळाला जामीन

गावकर म्हणाले की, सत्तरीत साहित्य निर्मिती होऊ लागली आहे. दर्जेदार साहित्याची निर्मिती होत असताना हे साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांच्या कार्याची व त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर, गायकवाड म्हणाले, गोव्यात मराठी भाषेची सेवा वाढत आहे. त्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात ही कौतुकाची बाब आहे. अशा कार्यक्रमांतून अभिरुची वाढण्यास मदत होते आहे. सरकारनेही विकास करण्याच्या दृष्टिकोनातून साहित्य क्षेत्रात योगदान दिले आहे.

मराठी साहित्य संमेलन
वाठादेव नदीवरील पुराचा धोका आता टळणार

सूत्रसंचालन प्रिया गावकर यांनी केले. ठाणे पंचक्रोशी महिला मंडळाने स्वागतगीत तर नानेली मराठी युवती मंडळातर्फे ईशस्तवन सादर केले. यावेळी साहित्य दिंडीही काढण्यात आली. नरहरी हळदणकर यांनी स्वागत केले. गोविंद गावकर, अशोक गावकर यांचा सत्कार करण्यात आला. नंतर ‘प्राथमिक शाळांची दशा व दिशा’ या विषयावर परिसंवाद व कविसंमेलन झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com