वाठादेव नदीवरील पुराचा धोका आता टळणार

डिचाेलीत समाधान: बगलमार्ग नदीवरील पुलाचे काम सुरू
River
River Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: राज्य महामार्गाअंतर्गत डिचोलीतील बगलमार्गात येणाऱ्या पिराचीकोंड-डिचोली येथील नदीच्या फाट्यावरील संभाव्य संकट आता टळणार आहे. या नदीवर मिनी पूल बांधण्यात येणार असून, या कामाला अखेर चालनाही मिळाली आहे. राज्य महामार्गाअंतर्गत डिचोलीत सुमारे 71 कोटी रुपये खर्चून 4.25 किलोमीटरचा बगलमार्ग बांधण्यात येत आहे. हे काम जोरात सुरू आहे.

River
झुआरी नदीवरील नवीन पुलाचे काम जोरात सुरू

डिचोली पालिका क्षेत्रातील पिराचीकोंड-देवकीनगर भागातून जाणाऱ्या बगलमार्गात येणाऱ्या आणि डिचोली नदीला जोडणाऱ्या वाठादेव नदीच्या फाट्यावर पाईप बसवून मातीचा रस्ताही तयार करण्यात आला आहे. या रस्त्याची तसेच जवळपासच्या भरावातील दगड-माती नदीत सरकत असल्याने नदीचे पात्र काही प्रमाणात बुजले आहे. नदीच्या पात्रात दगड-माती सरकत राहिल्यास पात्र बुजून भविष्यात पुराची आपत्ती ओढवण्याचा धोका आहे. नागरिकांकडूनही तशी भीती वर्तविण्यात येत आहे.

River
ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या परदेशी व्यक्तीला तब्बल 7 वर्षांनंतर मिळाला जामीन

दै. ‘गोमन्तक’मधून या समस्येवर प्रकाश टाकण्यात आल्यानंतर लागलीच 8 डिसेंबर रोजी या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता आत्माराम गावडे, साहाय्यक अभियंता फिलिप आदी अधिकारी तसेच स्थानिक नगरसेविका ॲड. रंजना वायंगणकर यांच्यासमवेत सभापती राजेश पाटणेकर संबंधित ठिकाणी जाऊन स्थितीची पाहणी केली. यावेळी पाटणेकर यांनी अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती जाणून घेतली. बगलमार्गाचे काम पूर्ण करण्यापूर्वी नदीच्या फाट्यावर पूल उभारण्यात येणार आहे. नदीत कोसळलेली दगड मातीही काढण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता गावडे यांनी दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com