Marathi Language: 'मराठी'लाही राजभाषेचा दर्जा द्या! भाषाप्रेमींनी फुंकले रणशिंग; 31 मार्च रोजी होणार 'निर्धार मेळावा'

Marathi Language Movement Goa: येत्या सोमवार म्हणजेच 31 मार्च रोजी मराठीप्रेमी कार्यकर्त्यांचा प्रातिनिधिक "निर्धार मेळावा" घेण्याचे निश्चित केले आहे.
Subhash Bhaskar Velingkar
Subhash Bhaskar VelingkarDainik Gomantak
Published on
Updated on

अभिजात मराठी भाषेलाही गोव्यात राजभाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी निर्णायक लढा देणाऱ्या आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी मराठी राजभाषा निर्धार समितीने, येत्या सोमवार म्हणजेच 31 मार्च रोजी मराठीप्रेमी कार्यकर्त्यांचा प्रातिनिधिक "निर्धार मेळावा" घेण्याचे निश्चित केले आहे.

पणजी (Panaji) येथील मिनेझीश ब्रागांझा सभागृहात सदर "निर्धार मेळावा" घेण्यात येणार आहे. सर्व 12 तालुक्यातील वीस प्रखंडांतून प्रातिनिधिक स्वरुपात कार्यकर्ते येथे एकत्र येतील. त्या सर्वांना मराठी राजभाषेसाठी अंतिम निर्णायक लढा देण्यासाठी कटिबद्धतेची "शपथ" देण्यात येणार आहे.

दरम्यान, व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार गुरुदास सावळ आणि "मराठी मायबोली" गटाचे प्रकाश भगत उपस्थित होते. गोमंतक मराठी अकादमी पर्वरी, मराठी भवनच्या सभागृहात, निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुकाणू समितीच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील मराठी राजभाषा आंदोलनाचे अध्वर्यू गो.रा. ढवळीकर यांनीही या बैठकीत मार्गदर्शन केले होते.

Subhash Bhaskar Velingkar
Marathi Language: मराठी, कोकणी म्हणजे गोमंतकीय परंपरा, संस्कृतीचे दोन डोळे; ‘सडेतोड नायक’ मध्ये मान्यवरांनी मांडली मते

निर्धार मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी सर्व प्रखंडांसाठी मराठीप्रेमी कार्यकर्त्यांच्या टीम्स निश्चित करण्यात येऊन प्रखंडस्थानी बैठकांचे नियोजन करण्यात आले. 10000 आवाहनपत्रांचे वितरण पहिल्या टप्प्यात करण्याचे ठरले. शेवटी सांघिक पसायदान होऊन बैठकीची सांगता झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com