Goa News: चिकोळणात 43.20 कोटींचे कोकेन जप्त, वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

Today's Marathi breaking News: गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन यासह जाणून घ्या राज्यातील इतर ताज्या घडामोडी
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Drug Case: चिकोळणात 43.20 कोटींचे कोकेन जप्त

पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 43.20 कोटी रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय.

Goa News: सर्पमित्र विराज नाईक यांनी पकडला २.५ मीटर लांबीचा किंग कोब्रा

सर्पमित्र विराज नाईक यांनी मंगळवार दि.१५ रोजी टेमवाडा केरी-सत्तरी येथे २.५ मीटर लांबीचा किंग कोब्रा पकडून वन खात्याच्या स्वाधीन केला

Goa Crime: श्रवण देविदास बर्वे प्रकरणी तपास सुरु; मृत्यदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविण्यात आला

आंबेडे नगरगांव येथे आढळलेल्या श्रवण देविदास बर्वे (24) यांच्या मृत्यू प्रकरणी तपास सुरु. घटनास्थळावरून पोलिस, अधिक्षक, अधिकारी, व फाॅरेन्सिक लॅबच्या पथकांनी घेतले विविध नमुने. मृत्यदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठविण्यात आला आहे.

Goa Fire News: गवत वाहून नेणाऱ्या मालवाहू टेम्पोला आग

कोला येथे सुके गवत वाहून नेणाऱ्या मालवाहू टेम्पोचा विद्युत खांबाच्या तारेशी संपर्क आल्यामुळे आग लागली. नंतर काणकोण अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली.

Goa Crime: गोव्यात सर्वात मोठा ड्रग्जचा साठा जप्त

गुन्हे शाखेने मुरगांव येथे निबू व्हिन्सेंट उर्फ ​​विल्सन (४५) याला ४२.२० कोटी रुपयांचे ४.३२५ किलो कोकेन बाळगल्याप्रकारणी अटक केली. गोव्यात आतापर्यंतचा हा सर्वात मोठा ड्रग्जचा साठा आहे.

Goa Crime: नगरगांव सत्तरीत आढळला युवकाचा मृतदेह, घातपाताचा संशय

नगरगाव, आंबेडे येथील हनुमान मंदिराजवळ श्रावण बर्वे (२४) यांचा संशयास्पद मृत्यू. पोलिस घटनास्थळी दाखल. घातपाताची शक्यता. पोलिस घटनास्थळी दाखल. तपास सुरू.

Govind Gaude Goa: मंत्री गावडेंकडून हात वर,जबाबदारी घेण्याऐवजी पीडब्ल्युडीकडे दाखवले बोट

पुरुष नाटकाच्या प्रयोगावेळी झालेल्या प्रकाश योजनेच्या घोळावर मंत्री गोविंद गावडेंकडून हात वर.थेट जबाबदारी स्विकारण्या ऐवजी पीडब्ल्युडीकडे दाखवले बोट. अहवाल मागितलाय,एक दिवसात मिळणे अपेक्षित. मंत्री गावडेंचा दावा.

Suleman Khan Case: सुलेमानची याचिका न्यायालयाने फेटाळली

जुने गोवा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या पलायन प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याची विनंती करणारी जमीन हडप करणाऱ्या सिद्दीकी उर्फ ​​सुलेमान खान यांनी दाखल केलेली रिट याचिका गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली.

Suleman Khan Case: सुलेमानकडून सीबीआय चौकशीची मागणी

जमीन हडप प्रकरणातील आरोपी सुलेमान उर्फ ​​सिद्दीकी यांनी हायकोर्टात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये जुने गोवा पोलिसांनी नोंदवलेल्या पलायनाचे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. यावर मंगळवार (दि.१५) रोजी सुनावणी होणार आहे.

FDA Raid Mapusa: म्हापसा येथील सुप्रसिद्ध वाळके हॉटेलची तपासणी; अस्वच्छतेमुळे हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश

एफडीए टीमने म्हापसा येथील सुप्रसिद्ध वाळके हॉटेलचीही तपासणी केली आणि परिसरात आढळलेल्या अस्वच्छ परिस्थितीमुळे ते बंद करण्याचे आदेश दिले. स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्याने सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला.

FDA Raid Goa: एफडीए अधिकाऱ्यांकडून आंबा घाऊक विक्रेत्यांची सखोल तपासणी

संचालक श्वेता देसाई मार्गदर्शनाखाली, उत्तर गोव्याचे डिसिगंटेड ऑफिसर रिचर्ड नोरोन्हा, सीनियर फूड सेफ्टी ऑफिसर राजाराम पाटील, लेनिन देसा, अमित मांद्रेकर आणि फूड सेफ्टी ऑफिसर्स सफिया खान यांच्या समावेश असलेल्या एफडीए पथकाने स्थानिक ७ युनिट्स आणि म्हापसा सब यार्डमध्ये इतर राज्यातील ८ युनिट्सची तपासणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Fire Safety Training In Goa
 Anmod Forest Murder Case
Nepalese Man Acquitted In POCSO Case
Vagator Beach Hostel Drug Racket
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com