Goa News: कुचेली येथे तिळारी कालव्यात तरुणाचा बुडून मृत्यू; वाचा गोव्यातील दिवसभरातील घडामोडी

Today's Marathi Breaking News: मराठीमध्ये जाणून घ्या गोव्यातील ठळक घडामोडी
Goa Latest Crime News
Crime News Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident: कुचेली येथे तिळारी कालव्यात तरुणाचा बुडून मृत्यू

२६ वर्षीय तरुण ओंकार प्रभु देसाई (शेट्येवाडा, म्हापसा) याचा म्हापसा येथील कुचेली येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळील तिळारी कालव्यात बुडून मृत्यू.

Goa Accident: फोंडा येथील जुन्या बस स्थानकावर अज्ञात दुचाकीची पादचाऱ्याला धडक

फोंडा येथील जुन्या बस स्थानकावर अज्ञात दुचाकीची धडक बसून पादचारी जखमी. दुचाकीसह चालकाने काढला पळ.

आमदार संकल्प आमोणकर यांनी साजरा केला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा वाढदिवस

मुरगाव भाजप मंडळ आणि आमदार संकल्प आमोणकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा वाढदिवस सडा येथे साजरा केला आणि गोव्याच्या प्रगतीसाठी त्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. आमोणकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या गतिमान नेतृत्वाखाली मुरगावमधील महत्त्वाचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत.

दवर्लीतील उड्डाणपूलाच्या जागेची खासदार तानावडेंनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत केली पाहणी

भाजपचे राज्यसभा खासदार आणि माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दवर्ली रेल्वे फाटकाजवळ प्रस्तावित उड्डाणपूलाच्या जागेची गुरुवारी (24 एप्रिल) रेल्वे अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.

Ponda News: शुक्रवारी मुर्डी खांडेपार पूरग्रस्त भागाच्या ठिकाणी होणार 'मॉक ड्रील'!

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाच्या अंतर्गत मुर्डी खांडेपार येथे शुक्रावारी सकाळी होणार मॉक ड्रील. मॉक ड्रीलच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांनी संबधीत सर्व सरकारी यंत्रणेसह घेतला स्थितीचा प्रत्यक्ष आढावा‌.

Bicholim News: स्थायी समितीच्या विषयावरून डिचोली पालिका मंडळाची बैठक तहकूब

स्थायी समितीच्या विषयावरून डिचोली पालिका मंडळाची बैठक तहकूब. मात्र 'पहलगाम' मधील हल्ल्याचा पालिकेकडून निषेध. सोमवारी (ता. २८) रोजी होणार स्थायी समितीची बैठक.

Goa News Marathi: बड्या धेंड्यांचा प्रताप, सर्वसामान्यांना मनस्ताप

पणजी पोस्ट ऑफिसजवळ बेशिस्तपणे पार्क केलेली चारचाकी. त्यामुळे स्कूल बस आणि उन्हात मुलांनी 15 मिनिटे तटकळत बसावे लागले. काही लोक संतापले होते. वाहतूक पोलीस नसल्याने लोक बेशिस्तपने गाड्या पार्क करतातं.

Pramod Sawant Birthday: "आरोग्य सांभाळा, हीच मला मोठी भेट"

आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व सेलिब्रेशनचे कार्यक्रम रद्द केले तरी सेवा कार्यक्रम सुरू आहेत. लोकांनी आपणास शुभेच्छा देण्यासाठी गर्दी न करता आरोग्य शिबिरांचा लाभ घेत आपले आरोग्य निरोगी राखावे, हीच आपणास गोमंतकीयांकडून मोठी शुभेच्छा व भेट ठरणार - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. रवींद्र भवनात आयोजित मेगा आरोग्य शिबिरास भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी.

Deviya Rane Goa: पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे आमदार देविया राणे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामुळे, गोव्याच्या आमदार देविया राणे यांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांच्या हितचिंतकांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही भेटी किंवा समारंभाचे नियोजन टाळण्याची विनंती केली आहे.

Goa News: सांगे येथील वेळीपवाडा येथे एलपीजी सिलिंडरचा स्फोट

सांगे येथील भाटी पंचायत येथील विलियन गावातील वेळीपवाडा येथील झोपडीत एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला. काही घरातील वस्तूंचे नुकसान झाले. कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com