Goa News: 'रिचार्ज पॅक'च्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी, आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Marathi Breaking News 13 June 2025: जाणून घ्या राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि इतर महत्वाच्या घडामोडी
Goa News: 'रिचार्ज पॅक'च्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी, आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी
Crime|ArrestDainik Gomantak
Published on
Updated on

'रिचार्ज पॅक'च्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी, आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी

'रिचार्ज पॅक'च्या नावाखाली साखळीतील एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी, आरोपी प्रदीपकुमार मंडल याला डिचोली न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे

कुंभारखण सत्तरीतील ‘ड्रग्स पॅडलर’ला तीन दिवसांची पोलिस कोठडी

कुंभारखण सत्तरीतील ‘ड्रग्स पॅडलर’ अभय रामा गावकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी

विरोधीपक्ष नेते युरींनी बोलावली सर्व विरोधी आमदारांची बैठक

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मंगळवारी सर्व विरोधी आमदारांची बैठक बोलाविल्याची माहिती‌. या बैठकीत पावसाळी विधानसभा अधिवेशनात सरकारला घेलण्यासंबंधीच्या व्युहरचनेवर होणार चर्चा

मांद्रे पोलिस स्थानकाला लवकरच मिळणार नवे रॉबर्ट वाहन, तीन प्रकल्पांसाठी 4 हजार चौरस मीटर सरकारी जमिनीसाठी प्रस्ताव

मांद्रे पोलिस स्थानकासाठी आणखीन एक रॉबर्ट वाहन लवकरच मिळणार. नव्या पोलिस स्थानक इमारतीसाठी उपलब्ध असलेल्या सरकारी जागेत 4 हजार चौरस मीटर जमिनीसाठी सरकार दरबारी पाठवलाय प्रस्ताव. ह्या जागेत नवी पोलिस स्थानक इमारत, फायर स्टेशन आणि ट्राफीक विभाग ह्या प्रकल्पांसाठी लवकरता लवकर पायाभरणी करण्याचा माझा प्रयत्न आहे. मांद्रेचे मगो आमदार जीत आरोलकरांची माहिती.

रोहित मोन्सेरात हे आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर चढणारे भारतातील पहिले महापौर

पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात हे आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर आणि जगातील सर्वात उंच पर्वत माउंट किलिमंजारो चढणारे भारतातील पहिले महापौर बनले आहेत. त्यांनी शिखरावर पोहोचण्यासाठी सात दिवसांचा कठीण ट्रेक पूर्ण केला. माउंट किलिमंजारो हे प्रसिद्ध "जगातील ७ शिखरांपैकी" एक आहे.

"सुसज्ज आयआयटी उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील"

गोव्यात जागेचा प्रश्न सोडवून लवकरच सुसज्ज आयआयटी उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील - मुख्यमंत्री प्रमोद सावंत.

मांद्र जूनस वाडा येथे एक कोटी रुपये खर्च करून सार्वजनिक स्मशानभूमी उभारण्यास सुरुवात

मांद्र जूनस वाडा येथे दोन हजार चौरस मीटर जागेत एक कोटी रुपये खर्च करून सार्वजनिक स्मशानभूमी उभारण्याच्या कामाचा आमदार जीत आरोलकर सरपंच रॉबर्ट फर्नांडिस यांच्या उपस्थितीत सुरुवात.

थातोड- धारबांदोडा येथे अज्ञात वाहच्या धडकेत दोन म्हशी दगावल्या

थातोड- धारबांदोडा येथे अज्ञात वाहच्या धडकेत दोन म्हशी दगावल्या. रस्त्यावर मृत पडलेल्या म्हशीचा धक्का चुकविण्याच्या नादात कार दरीत कोसळली. कार चालक सुखरूप. पहाटे ३ वाजण्याची घटना.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com