
Marathi Actress Varsha Usgaonkar In Goa Viral Video
पणजी: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाच्या माध्यमातून ठसा उमटवणारी गोव्याची लेक आणि अभिनेत्री वर्षा उसगांवकर सध्या गोव्यात आहेत. व्यस्त कामातून वेळ मिळाला की त्या गोव्याला जातात. सध्या वर्षा उसगांवकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या गोव्याच्या किनारी विहरताना दिसत आहेत. सोशल मीडियावरील त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगलीच पसंती मिळत आहे. आधी तुम्हा हा व्हिडिओ पाहा...
दरम्यान, सोशल मीडियावरील या व्हिडिओमध्ये तुम्ही वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांना गोव्यात एन्जॉय करताना पाहू शकता. व्हिडिओमध्ये मराठीतील प्रसिद्ध नाव बा. भ. बोरकर यांची कविता ''माझ्या गोव्याच्या भूमित...'' बॅकग्राऊंडमध्ये गायली जात आहे. वर्षा उसगांवकर या व्हिडिओच्या माध्यमातून गोव्याच्या निसर्ग सौेदर्याबरोबर इथलं प्रफुल्लीत करणारं वातावरण कसं साद घालतं हे सांगताना दिसत आहेत.
वर्षा उसगांवकर यांचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्या गोव्याला टीबीमुक्त करण्याचा संदेश देताना दिसल्या होत्या. टीबी रुग्णांसाठी खबरदारी आणि वेळेवर उपचार घेणे किती गरजेचे आहे याबद्दल वर्षा उसगांवकर या व्हिडिओमध्ये सांगताना दिसल्या होत्या. टीबी रुग्णांनी आपल्या आरोग्याबाबत (Health) कोणत्याही प्रकारचा हालगर्जीपणा करु नये असेही त्यांनी सांगितले होते. सरकारकडून गोमंतकीयांसाठी राबवण्यात येणाऱ्या जागृती मोहीमांमध्ये वर्षा उसगांवकर हिरीरीने भाग घेतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.