Mapusa Urban Bank : लोकांचे कोट्यवधी रुपये कधी देणार? श्रीपाद नाईक आक्रमक

Mapusa Urban Bank : मी काय केले किंवा केले नाही, यापेक्षा लोकांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा केली पाहिजे, असा टोला भाजपचे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीपाद नाईक यांनी लगावला.
Mapusa Urban Bank In Goa
Mapusa Urban Bank In GoaDainik Gomantak

Mapusa Urban Bank :

पणजी, म्हापसा अर्बन बॅंक बुडाली. त्यात अनेकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. ते पैसे लवकर कसे मिळतील, यावर चर्चा करण्याची गरज आहे.

मी काय केले किंवा केले नाही, यापेक्षा लोकांच्या ज्वलंत प्रश्नांवर चर्चा केली पाहिजे, असा टोला भाजपचे उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीपाद नाईक यांनी लगावला.

म्हापसा मतदारसंघात प्रचार दौऱ्यादरम्यान ते म्हणाले, १९९९ साली मी ॲड. रमाकांत खलप यांना हरविले होते. त्यांनी एवढी जर चमकदार कामगिरी केली असती तर जनता तेव्हाच त्यांना निवडणार होती. जनतेने त्यांना पराभूत केले आहे.

Mapusa Urban Bank In Goa
Goa Today's News Wrap: लोकसभा निवडणूक, गुन्हे, पर्यटन विश्वातील ठळक घडमोडींचा आढावा

त्यामुळे त्यांनी इतिहासात फार रमण्यापेक्षा सद्यस्थितीवर आणि प्रश्नांवर बोलावे. आताही मी त्यांना मोठ्या मताधिक्याने पराभूत करणार आहे, हेही लक्षात ठेवावे. खासदार निधीच्या माध्यमातून सुचविलेल्या तब्बल बाराशे प्रकल्पांपैकी अकराशे प्रकल्प पूर्ण झाले आहेत.

ती कामे कोणती, याची माहिती लेखी स्वरूपात मतदारांना मी उमेदवारी अर्ज सादर केल्यावर देणार आहे. त्यांनी चर्चा करण्यात वेळ घालविण्यापेक्षा मतदारांकडे जाण्यासाठी वेळ द्यावा. आम्ही प्रचाराची एक फेरी पूर्ण केली आहे, हे विसरू नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com