Mapusa Police
Mapusa PoliceDainik Gomantak

Mapusa News : जलतरणपटू जेरी डिमेलोचा म्हापसा पोलिसांतर्फे सत्कार; चार सुवर्ण, दोन रौप्य, तीन कांस्य पदके

Mapusa News : पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या हस्ते जेरी याला स्मृतिचिन्ह, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देण्यात आला. जेरी हा आकय-म्हापसा येथील रहिवासी आहे.
Published on

Mapusa News :

म्हापसा, राष्ट्रीय स्तरावरील फ्री स्टाईल जलतरणात उत्कृष्ट कामगिरीबद्दल म्हापसा पोलिस स्थानकातर्फे जलतरणपटू जेरी डिमेलो याचा सत्कार करण्यात आला.

पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या हस्ते जेरी याला स्मृतिचिन्ह, भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देण्यात आला. जेरी हा आकय-म्हापसा येथील रहिवासी आहे.

यावेळी उपनिरीक्षक अभिजीत नाईक, हेड कॉन्स्टेबल सुशांत नाईक चोपडेकर, शिवाजी शेटकर आणि मान्यवर उपस्थित होते.

Mapusa Police
South Goa : ध्रुवीकरणाचा मुद्दा भाजपवर बुमरँग; दक्षिणेतील पराभव ख्रिस्ती धर्मगुरूंमुळे हे ढवळीकर, माविन यांना अमान्य

जेरी याने राष्ट्रीय स्तरावरील फ्री स्टाईल जलतरणात आतापर्यंत ४ सुवर्णपदके, २ रौप्य पदके व गेल्या आठ वर्षांत ३ कांस्य पदके पटकावली आहेत. २०१२ पासून तो जलतरण या क्रीडा प्रकारात सक्रिय असून सध्या तो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतो. तसेच जलतरणाच्या राष्ट्रीय स्तरावरील संमेलनात तो भाग घेत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com