Mapusa: म्हापसा उपआरोग्य केंद्राची लवकरच सुधारणा होणार; वित्त आयोगाच्या निधीतून कामाचा खर्च

पालिका मंडळाचा एकमुखी ठराव- १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करणार कामाचा खर्च
Health center
Health centerDainik Gomantak

Mapusa: घाटेश्वरनगरमधील विद्यमान नागरी उपआरोग्य केंद्राची सुधारणा करण्याचा एकमुखी ठराव म्हापसा पालिका मंडळाने घेतला असून 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून हे काम केले जाणार आहे. त्याव्यतिरिक्त अशाच प्रकारची आणखी तीन उपआरोग्य केंद्रे शहरात उभारण्याचा पालिकेचा विचार आहे.

घाटेश्वरनगरमधील उपआरोग्य केंद्र सोयीसुविधांनी अद्ययावत करण्याच्या कामासाठी २१ लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी दिली. मंगळवारी (ता. 3) सायंकाळी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष पालिका मंडळाची बैठक झाली.

यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर उपस्थित होते, तर नगरसेवक आनंद भाईडकर, विकास आरोलकर, नूतन बिचोलकर, किशोरी कोरगावकर, स्वप्नील शिरोडकर हे गैरहजर राहिले.

मुख्याधिकाऱ्यांनी या उपआरोग्य केंद्राविषयी मंडळास माहिती देताना सांगितले की, ही उपकेंद्रे अंशतः पालिकेअंतर्गत राहतील. तेथील अतिरिक्त कर्मचाऱ्यांचा पगार व आवश्यक उपकरणांचा खर्च याच वित्त आयोगाच्या निधीतून उचलला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Health center
Nilesh Cabral: चांदर-कुडतरी पूल जानेवारी अखेरीस वाहतुकीस खुला

दरम्यान, बोडगेश्वर जत्रोत्सवातील स्टॉल्सकडून शुल्क आकारणीच्या विषयाच्या चर्चेवेळी नगरसेवक साईनाथ राऊळ म्हणाले, पहिल्यांदाच यंदा पालिकेने मंदिर समितीसोबत मिळून जत्रोत्सवासाठी विशेष आराखडा बनवला आहे.

यासाठी मुख्याधिकारी, अभियंते व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. आराखड्यानुसारतिथे स्टॉल थाटले गेले पाहिजेत. जेणेकरून सुसूत्रता राहण्यास मदत होईल. किमान तसे प्रामाणिक प्रयत्न झाल्यास या आराखड्याचे चीज होईल, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com