Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

Mapusa Crime: गणेशपुरी-म्हापसा येथील सशस्त्र दरोड्याच्या घटनेला दोन दिवस उलटून गेले असतानाही गोवा पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागलेले नाहीत.
Mapusa robbery update
Mapusa robbery update
Published on
Updated on

म्हापसा: गणेशपुरी-म्हापसा येथील सशस्त्र दरोड्याच्या घटनेला दोन दिवस उलटून गेले असतानाही गोवा पोलिसांच्या हाती ठोस धागेदोरे लागलेले नाहीत. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या या घटनेनंतर पोलिसांनी आठ विशेष पथके तैनात केली आहेत.

ही पथके बेळगाव, बिजापूर, कोल्हापूर, बंगळुरू, मुंबई आणि हैदराबाद येथे संशयितांचा मागोवा घेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. तपास यंत्रणांनी घटनेनंतर तात्काळ नाकाबंदी करण्याकडे दुर्लक्ष केल्याने दरोडेखोर सहज गोव्याच्या सीमाबाहेर पसार झाल्याची टीका आता समाजमाध्यमांवर होत आहे.

गोवा पोलिसांची आठ विशेष पथके, दरोडेखोरांच्या शोधार्थ शेजारील राज्यांत पोहोचली. पोलिसांना या दरोडेखोरांचे ‘लोकेशन’ बेळगाव शहरात आढळल्याने पथके मंगळवारपासून बेळगावमध्ये तळ ठोकून आहेत. बेळगावमध्ये दरोडेखोरांचा गट अलग झाला व सर्वजण वेगवेगळ्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथके बिजापूर, कोल्हापूर, बंगळुरु, मुंबई तसेच हैदराबादपर्यंत पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Mapusa robbery update
Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

गणेशपुरी रहिवासी सोसायटीच्यावतीने शिष्टमंडळाने पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांची बुधवारी (ता.८) भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या शिष्टमंडळात स्थानिक नगरसेविका डॉ. नूतन बिचोलकर, माजी नगराध्यक्ष आशिष शिरोडकर, दत्ताराम बिचोलकर, डॉ. गुरुदास नाटेकर आदींचा समावेश होता.

निवेदनात म्हटले की, गणेशपुरी परिसरात पोलिस गस्त वाढवून सुरक्षिततेच्या अनुषंगाने कडक व्यवस्था करावी. येथील बसशेड परिसरात कायमस्वरुपी पोलिस आउटपोस्ट सुरू करुन तिथे पोलिसांची नियुक्ती करावी. या भागांत स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची तयारी दाखविली आहे.

Mapusa robbery update
Goa Accident: पर्यटक महिलेची बेफिकिरी नडली, दारूच्या नशेत गाडी ठोकून 'ती' फरार; स्कुटरस्वार गंभीर जखमी

गणेशपुरी रहिवासी सोसायटीच्यावतीने शिष्टमंडळाने पोलिस उपअधीक्षक विल्सन डिसोझा यांची बुधवारी (ता.८) भेट घेत, विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

दरोडेखोरांनी पणजीतून खासगी टॅक्सी करून, साखळी-चोर्लामागे बेळगाव गाठले. ज्या टॅक्सीचालकाने दरोडेखोरांना बेळगावमध्ये सोडले, त्याचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे. टॅक्सीचालकाकडून आवश्यक माहिती घेऊन पोलिसांनी तपासाला दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या सात-आसनी टॅक्सीमधून दरोडेखोरांना टॅक्सीचालकाने सोडले, त्या गाडीची बुधवारी फॉरेन्सिक टीमने तपासणी केली. तसेच, म्हापसा पोलिसांनी बुधवारी गणेशपुरी भागात पुन्हा जाऊन चौकशी व नवीन सीसीटीव्ही फुटेज मिळते का, याचाही शोध घेतला.

३गणेशपुरी येथील जिमखाना मैदानाजवळ बस-शेडजवळ पोलिस आउटपोस्ट स्थापित करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे. तसेच पोलिसांना अपेक्षित सर्व सहकार्य देण्याची तयारी गणेशपुरी रहिवासी सोसायटीने दर्शविली असून निवेदनावर सोसायटीचे अध्यक्ष आशिष शिरोडकर, सचिव दत्ताराम बिचोलकर यांची स्वाक्षरी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com