Minor Girl Assault: लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये! म्हापशात विशेष तपासणी मोहीम, 43 जणांची पडताळणी, सातजणांना अटक

Mapusa Police Investigation: म्हापसा शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत.
Mapusa Police Investigation
Minor Girl AssaultDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: म्हापसा शहरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. बाजारात पोलिसांनी व्यापक पायी गस्त घालत विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत एकूण ४३ जणांची पडताळणी करण्यात आली असून, विविध कलमांन्वये सातजणांना अटक करण्यात आली.

आठवडी बाजारात पोलिसांनी संपूर्ण परिसरातील संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. व्यक्तींची ओळख आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. वैध कागदपत्रे किंवा ओळखपत्रे सादर करू न शकणाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. अन्य संशयितांची पार्श्वभूमी तपासल्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले.

Mapusa Police Investigation
Goa Government Spending: गोव्यात 5 वर्षांत इव्हेंट-महोत्सवांवर 675 कोटींचा खर्च; जनतेच्या पैशांची उधळपट्टी केल्याचा दुर्गादास कामत यांचा आरोप

सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणीही करण्यात आली होती. महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे. अशा प्रकारची तपासणी आणि गस्त यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, संशयित आरोपीस ७२ तासांच्या आत ताब्यात घेतल्याबद्दल म्हापसा पोलिस निरीक्षक अनंत गावकर यांचे स्वामी समर्थ परिवार मठाचे संस्थापक नीलेश वेर्णेकर व इतरांनी अभिनंदन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.