Mapusa Theft Case : दारूसाठी चोरले चांदीचे शिवलिंग आणि मोबाईल: संशयितास अटक

म्हापसा पोलिसांची यशस्वी कारवाई
Mapusa Theft Case
Mapusa Theft Case Dainik Gomantak

येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरातून चांदीचे शिवलिंग चोरणाऱ्या संशयितास म्हापसा पोलिसांनी पकडून चोरीला गेलेले शिवलिंग हस्तगत केले.

श्रीकांत उर्फ जग्गू गुरुनाथ पट्टर (35, मूळ राहणार हुबळी) असे संशयिताचे नाव आहे. दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने त्याने हे शिवलिंग तसेच मंदिरातील पुरोहिताचा मोबाईल आणि पेन ड्राईव्ह चोरला होता.

Mapusa Theft Case
Karnataka Election 2023 : मंत्री विश्‍वजीत राणे यांच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठी खूष!

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.28) सकाळी ही चोरीची घटना उघडकीस आली होती. संशयित श्रीकांतने मंदिराच्या गाभाऱ्यातील चांदीचे छोट्या आकाराचे शिवलिंग, पुरोहिताचा मोबाईल संच आणि एक पेन ड्राईव्ह चोरला होता.

म्हापसा पोलिसांनी संशयिताला शनिवारी ताब्यात घेऊन त्याच्याकडून शिवलिंग आणि पेन ड्राईव्ह हस्तगत केले. श्रीकांत याने शिवलिंग आपल्या पॅण्टमधील खिशात ठेवले होते, तर मोबाईल फोन कुणाला तरी विकल्याचे सांगण्यात आले.

संशयित हा म्हापसा बसस्थानकावर राहायला असतो आणि मिळेल ते काम करतो. त्याला दारू पिण्याची सवय असून, पैसे संपल्यामुळेच त्याने चोरी केल्याचे सांगण्यात आले. हे शिवलिंग २१४ ग्रॅम वजनाचे होते, अशी माहिती देवस्थानच्या अध्यक्षांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com