Mapusa News : म्हापसा औद्योगिक केंद्रात जनभागिदारी उपक्रम

कौशल्य विकास आणि उद्योगिकता संचालनालयाच्या संचालिका आयएएस श्रीमती ज्योतीकुमारी यांच्या हस्ते संस्थेच्या आवारात वृक्षारोपण
Mapusa News
Mapusa News Dainik Gomantak
Published on
Updated on

पेडे-म्हापसा येथील सरकारी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात जनभागिदारी उपक्रमांतर्गत अनेक कार्यक्रम आयोजिले. जी-२० परिषदेचे अध्यक्षपद भूषवण्याच्या निमित्ताने जनभागिदारी हा उपक्रम देशभर सुरू करण्यात आला. एक जूनपासून पंधरा दिवस चाललेल्या याया कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकास आणि उद्योगिकता संचालनालयाच्या संचालिका आयएएस श्रीमती ज्योतीकुमारी यांच्या हस्ते संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

प्रशिक्षणार्थी करता यावेळी भरती मेळावा आयोजिला. यात 48 औद्योगिक आस्थापनांनी भाग घेतला व 125 प्रशिक्षणार्थींची निवड केली. खास मुलींसाठी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी क्रीडा खात्याचे ज्युडो प्रशिक्षक विशांत आर्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले. आपत्कालिन परिस्थितीत हृदविकाराचा झटका यासारख्या रोगांना हाताळण्यासाठी डॉ. सिद्धार्थ नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षक व प्रसिक्षणार्थीकरती सीपीआर प्रशिक्षण घेण्यात आले.

Mapusa News
G20 Summit 2023 : ठरलं! देशभरात‘हेरिटेज स्टे’ला प्रोत्साहन, गोव्याबाबत मंत्री म्हणाले...

तसेच औद्योगिकता एक पर्यायी कारर्किद या विषयावर उद्योजक, म्हापसा आयटीआयचे ब्रँड अ‍ॅम्बेडिसर प्रविण च्यारी यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. त्यांना गौरी परब यांनी सहकार्य केले. तसेच प्रशिक्षणार्थीकरीता स्पर्धा घेण्यात आल्या. हे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विलास शेटगांवकर, जॉनी परेरा व इतरांचे सहकार्य लाभले. प्रा. देसाई यांच्या हस्ते बक्षिस वितरण करुन या कार्यक्रमाची सांगता झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com