Mapusa News : सकाळी खड्डे बुजवले; दुपारी माती गेली वाहून !, म्हापश्यात रस्त्यांची वाताहत

रस्त्यांच्या दुर्दशेमुळे वाहनचालकांत संताप
Mapusa News
Mapusa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा पालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर लहान मोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने वाहने खड्ड्यात जाताच चाक अडकून चालक रस्त्यावर पडतात. परिणामी अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत.

यामुळे वाहनचालकांतून संताप व्यक्त होत आहे. रस्त्यांची खड्ड्यांमुळे वाताहत होत असल्याचे पाहून दगड व माती घालून बुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, सकाळी माती घातली तर दुपारी ती वाहून जाते, ते दुपारी घातलेली माती संध्याकाळी वाहून जाते.

त्यामुळे खड्डे ‘जैसे थे’ रहात आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांसह स्थानिक रहिवाशांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

म्हापसा मतदारसंघातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. वाहने चालवताना वाहन चालकांना सर्कस केल्यासारखी वाहने चालवावी लागतात.

Mapusa News
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजचे पेट्रोल-डिझेल दर

गेल्या आठवड्यात चार-पाच वेळा अशा खड्ड्यांमध्ये माती, दगड घातले व ते वाहून गेल्याचेही लोकांनी प्रत्यक्ष पाहिले.संबंधित कंत्राटदार व्यवस्थित माती व दगड खड्ड्यांमध्ये घालत नसल्याचेही आढळलेले आहे.

तीन दिवसांपूर्वी म्हापसा जुन्या आझिलो इस्पितळाकडे काँग्रेस कार्यकर्त्याने रस्त्यावर खड्ड्यांमध्ये हेल्मेट ठेवून त्यावर पुष्पहार घालून निदर्शने केली. या द्वारे बांधकाम खात्याच्या कारभाराचा निषेध केला होता.

सध्या म्हापसा मतदारसंघात संपूर्ण ठिकाणी भूमिगत वीज वाहिन्यांचे काम चालू आहे, त्यामुळे रस्ते दुरूस्ती करणे मुश्कील आहे.येत्या नोव्हेंबरमध्ये संपूर्ण हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे.

Mapusa News
Goa Monsoon 2023 : डोंगरावरून एकाएकी चिखल, रेतीमिश्रीत पाणी नागरीवस्‍तीत

तसेच भूमिगत वाहिन्यांचे काम येत्या नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतरच रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येईल. तसेच वारंवार रस्त्यांचे खोदकाम होत असल्याने डांबरीकरण करणे शक्य नव्हते.

ज्योशुआ डिसोझा, आमदार

खोदकामांमुळे म्हापशातील बऱ्याच ठिकाणांवरील रस्ते खड्डेमय झाल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. लहान सहान अपघात व सर्व अडचणींवर मात करत वाहन चालवण्याचे लोकांचे कसब वाखाणण्यासारखेच म्हणावे लागेल. महत्वाचे म्हणजे पोलिसांचा ‘तालांव’ देण्यावरच भर असतो.

सुदेश प्र.तिवरेकर, उपाध्यक्ष, म्हापसा पिपल्स युनियन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com