Goa Rain Update: राज्यात आज व उद्या विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हाजेरी; IMD चा इशारा

गोवा वेधशाळेने दिला इशारा..
Goa Rain Updates
Goa Rain Updates Dainik Gomantak

पणजी: केरळ किनारपट्टीवर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात आज व उद्या विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हाजेरी असणार आहे; असा इशारा गोवा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

(Goa Rain Update)

Goa Rain Updates
Goa Education: आता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार कोडिंग आणि रोबोटिक्सचं शिक्षण

राज्यातील पावसाचा जोर गेल्या 24 तासांत कमी झाला होता , मात्र 21 पर्यंत राज्यात पावसाची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे.

तापमानात वाढ झाली असून पणजी येथे कमाल 32.4 अंश सेल्सिअस तर किमान 24.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारपासून उत्तर अंदमान समुद्र आणि शेजारच्या परिसरात चक्रीवादळाचे परिवहन आहे. सरासरी समुद्रसपाटीपासून 3.1किमी पर्यंत पसरले आहे,

Goa Rain Updates
Goa Police: आजाराऐवजी अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक

त्याच्या प्रभावाखाली, पुढील 24 तासांत दक्षिणपूर्व आणि लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.

मध्य बंगालच्या उपसागरावर 22 ऑक्टोबर रोजी सकाळी पश्चिमेकडे सरकण्याची आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत पश्चिममध्य बंगालच्या उपसागरात ते आणखी तीव्र होऊन चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com