Mapusa: विरोध डावलून होणार खासगी कॉलेजच्या मैदानाचा विकास; म्हापसा पालिकेचा ठराव मंजूर

Mapusa Muncipal Council : उपस्थित सात नगरसेवकांनी या प्रस्तावाला जोरदार हरकत घेतली, तर सत्ताधारी गटातील सात नगरसेवकांनी याला पाठिंबा दर्शविला. समान मतदान झाल्याने नगराध्यक्षांनी होकाराच्या बाजूने मतदान केल्याने हा ठराव मंजूर झाला.
Mapusa Muncipal Council
Mapusa Muncipal Council dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Municipal council to Develop St. Xavier's College Ground

म्हापसा: येथील सेंट झेवियर महाविद्यालयाच्या मैदानाचा विकास करण्याच्या उपसभापती तथा स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा यांनी मांडलेल्या प्रस्तावावर अलीकडेच झालेल्या म्हापसा पालिका मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली.

या चर्चेवेळी उपस्थित सात नगरसेवकांनी या प्रस्तावाला जोरदार हरकत घेतली, तर सत्ताधारी गटातील सात नगरसेवकांनी याला पाठिंबा दर्शविला. समान मतदान झाल्याने नगराध्यक्षांनी होकाराच्या बाजूने मतदान केल्याने हा ठराव मंजूर झाला.

विशेष म्हणजे, पाठिंबा दर्शविणाऱ्यांनी या प्रस्तावाचा म्हापसा शहरासाठी नेमका कोणता फायदा होईल हे सांगितले नाही किंवा प्रस्तावाच्या बाजूने आपले अभिप्राय दिले नाहीत. फक्त हात उंचावून प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याचे केवळ सोपस्कार संबंधितांनी पार पाडले. कारण हा प्रस्ताव स्थानिक आमदारांचा असल्यानेच संबंधितांनी होकाराच्या बाजूने मतदान केल्याचे दिसते.

मुळात ही खासगी शैक्षणिक संस्था आहे. शहरात इतरही मोकळ्या जागा आहेत, त्या जागांचा विकास करता येईल. मात्र, नगराध्यक्षांनी हा प्रस्ताव कुठल्याही परिस्थितीत मंजूर करून घेण्यासाठी आपले सर्वतोपरी प्रयत्न केले व त्या एकच मुद्यावर ठाम राहिल्या की, मैदानाचा विकास झाल्यास म्हापसेकरांना याचा लाभ होईल. तेथे सर्वसामान्यांना प्रवेश असावा, अशी अट आम्ही घालू. मात्र, ही मालमत्ता खासगी महाविद्यालयाची आहे व सुरक्षेच्या कारणास्तव कुठल्याही बाहेरच्या लोकांना त्याठिकाणी प्रवेश देतीलच असे नाही, असे विरोधी गटातील नगरसेविका कमल डिसोझा म्हणाल्या. मात्र, विरोध डावलून अखेर या प्रस्तावाला मतदान घेण्यात आले.

‘खुल्या जागेत निधीचा वापर करावा’

विरोध करणाऱ्या नगरसेवकांनी खासगी जागेचा विकास करण्यापेक्षा सार्वजनिक खुल्या जागेत या निधीचा वापर करावा अशी मागणी केली होती. कारण हे मैदान खासगी महाविद्यालयाची मालमत्ता असल्याने सर्वसामान्यांना तेथे प्रवेश मिळेल की नाही, याबाबत संबंधितांनी शाशंकता व्यक्त केली होती. मुळात महाविद्यालय व्यवस्थापनाकडे आपल्या मैदानाचा विकास करण्यासाठी पैसे नाहीत का? असा सवाल या प्रस्तावाला विरोध करणाऱ्या नगरसेवकांपैकी अ‍ॅड. शशांक नार्वेकर यांनी केला.

Mapusa Muncipal Council
Panaji: 'भाडेकरार' नाही, तर ‘ना हरकत’ नाही! मनपाची कारवाई; मार्केटमधील दुकानांची तोडली ‘वीज’

चुकीचा पायंडा; आरोलकर

नगरसेवक अ‍ॅड. तारक आरोलकर यांनी या प्रस्तावाला कडाडून विरोध केला. ते म्हणाले की, खासगी जागेचा विकास करण्यापेक्षा सार्वजनिक खुल्या जागेत या निधीचा वापर करावा. घाईगडबडीत जनतेचा पैसा कुठेही वापरात आणू नये. मुळात किती निधी या मैदानासाठी लागणार याची आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे उगाच प्रस्तावाला परवानगी देऊ नये. नगराध्यक्ष चुकीचे पायंडे अंमलात आणत आहेत, असा आरोप केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com