Panaji: 'भाडेकरार' नाही, तर ‘ना हरकत’ नाही! मनपाची कारवाई; मार्केटमधील दुकानांची तोडली ‘वीज’

Panaji Municipal Corporation Market: पणजी महानगरपालिकेच्या मालकीच्या मार्केट इमारतीत दुकानगाळ्यांचा भाडेकरार रखडला आहे. दुकानमालक भाडेकरार करीत नाहीत, तर त्यांना वीज कनेक्शन घेण्यासाठी ‘ना हरकत दाखला’ न देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.
Goa Electricity Department
Goa Electricity DepartmentCanva
Published on
Updated on

Panaji Municipal Market Shops Rent Agreement Dispute

पणजी: पणजी महानगरपालिकेच्या मालकीच्या मार्केट इमारतीत दुकानगाळ्यांचा भाडेकरार रखडला आहे. दुकानमालक भाडेकरार करीत नाहीत, तर त्यांना वीज कनेक्शन घेण्यासाठी ‘ना हरकत दाखला’ न देण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे.

महापालिकेच्या आक्रमक पवित्र्यामुळे सध्या येथील दुकानगाळ्यांच्या वीज जोडण्या तोडल्या गेल्या आहेत. भाडेकरार झाल्याशिवाय त्यांना पुढील कारवाई करता येणार नसल्याची माहिती हाती आली आहे.

इमारतीतील अनेक दुकानमालकांनी दुकाने भाड्याने दिलेली आहेत. त्यात नगरसेवक, महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्याशिवाय गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळाकडे असणाऱ्या यादीनुसार भाडेकरार करण्यासाठी महानगरपालिका आग्रही आहे. परंतु भाडेकरार करण्यासाठी पुढे येत नसल्याने आता दुकानांना विजेसाठी हवा असणारा ‘ना हरकत दाखला’ न देण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे.

आधी करार करा, मगच एनओसी

भाडेकरार करा, मगच वीज जोडणीसाठी दाखला न्या, अशी भूमिका महानगरपालिकेने घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काहीजणांनी आमदार बाबूश मोन्सेरात यांच्याशी याविषयी संपर्क साधला परंतु त्यांच्याकडून त्याविषयी हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता करार करण्यासाठी कितीजण उद्या (बुधवारपासून) महानगरपालिकेत येतात, ते पहावे लागणार आहे. या अटीतून मात्र सोपो ज्यांचा आहे, त्यांना मात्र त्यातून सूट देण्यात येणार आहे. सोपोवर व्यवसाय करणाऱ्यांकडून महानगरपालिका दररोज भाडे गोळा करीत असल्याने त्यांच्यासाठी त्यात सवलत देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com