Assagao News: म्हापसा पालिकेची करामत! 'आसगाव पठारावर' पुन्हा कचऱ्याचा डोंगर

Assagao Garbage Problem: म्हापसा पालिकेने साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची विनंती गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाला केली आहे. आणखीन महिनाभरात आसगाव पठार परिसरात पुन्हा दुर्गंधीचे साम्राज्य पसरणे आता दूर नाही
Assagao Garbage Problem: म्हापसा पालिकेने साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची विनंती गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाला केली आहे. आणखीन महिनाभरात आसगाव पठार परिसरात पुन्हा दुर्गंधीचे साम्राज्य पसरणे आता दूर नाही
Assagao Waste ProblemDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: म्हापसा पालिकेने पुन्हा आसगाव पठारावर कचरा फेकणे सुरू केले आहे. २०२२ मध्ये या पठारावर पालिकेने साचवलेल्या सर्व कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली होती. तो परिसर स्वच्छ करण्यात आला होता. आता म्हापसा पालिकेने साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची विनंती गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाला केली आहे. आणखीन महिनाभरात आसगाव पठार परिसरात पुन्हा दुर्गंधीचे साम्राज्य पसरणे आता दूर नाही.

आसगाव येथे म्हापसा (Mapusa) पालिका क्षेत्रात गोळा केला जाणारा कचरा पालिकेकडून फेकला जात होता. तब्बल १ लाख ५५ हजार ३३३ घन मीटर कचरा तेथे साचला होता. तो परिसर दुर्गंधीमय झाल्यानंतर महामंडळाला विनंती करून साऱ्या कचऱ्यावर पालिकेने प्रक्रिया करवून घेतली. तो परिसर स्वच्छ झाला होता.त्यानंतरही पालिकेने कचरा फेकणे सुरू ठेवल्याने यावर्षी आणखीन ३१ हजार ३६८ घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया केली. आता आसगाव येथे २० हजार घनमीटर कचरा फेकण्यात आलेला आहे. त्यावर प्रक्रिया न केल्यास तो परिसर दुर्गंधीमय होण्याची शक्यता आहे. त्या कचऱ्यातून दुर्गंधीमय पाणी वाहू लागले असून त्यामुळे त्या परिसरातील भूजल प्रदूषित होणे सुरू झाले आहे.

म्हापसा परिसरातून ३० टन कचरा गोळा केला जातो. त्यापैकी केवळ ४ टन कचरा कधी कधी साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात पाठवला जातो. दररोज साधारणपणे २० टन कचरा आसगाव पठारावर फेकण्यात येत आहे. पालिकेने साळगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात दररोज संकलित केला जाणारा कचरा पाठवणे अपेक्षित असताना तसे केले जात नसल्याचे आढळून आले आहे.

Assagao Garbage Problem: म्हापसा पालिकेने साचलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची विनंती गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाला केली आहे. आणखीन महिनाभरात आसगाव पठार परिसरात पुन्हा दुर्गंधीचे साम्राज्य पसरणे आता दूर नाही
Assagao: खड्ड्यांतील पाण्यात बसचालकांचा ठिय्या! आमरण उपोषणाचा इशारा

कुचेलीत कचरा प्रकल्प

म्हापसा पालिकेने कुचेली येथे प्रति दिवस ५ टन क्षमतेचा कचरा प्रक्रिया प्रकल्‍प उभारला आहे.तो वापरात नाही. पाच टन सुक्या कचऱ्यावर करण्याची कंपनीच्या सामाजिक जबाबदारीखाली व्यवस्था केली गेली आहे. तरीही आसगावच्या पठारावर कचरा टाकणे बंद झालेले नाही, असे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com