Goa Govt
Goa Govt Dainik Gomantak

गोवा सरकारची घोडचूक; 98 सरकारी विभागाचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड केले सार्वजनिक

धक्कादायक बाब म्हणजे याबाबत एक सार्वजनिक नोटीस काढून ती नोटीस देखील ऑनलाईन अपलोड करण्यात आली
Published on

गोवा सरकारकडून झालेली मोठी सायबर चूक समोर आली आहे. सरकारने तब्बल 98 सरकारी विभागाचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड सार्वजनिक केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे याबाबत एक सार्वजनिक नोटीस काढून ती नोटीस देखील ऑनलाईन अपलोड करण्यात आली आहे. या नोटीसमध्ये सर्व सरकारी विभागाचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड देण्यात आले आहेत.

याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी विभागाकडून 08 फेब्रुवारी रोजी एक नोटीस जारी करण्यात आले. यामध्ये 98 सरकारी विभागाचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड देण्यात आले होते. विभागाने आपला वार्षिक अहवाल जमा करण्यासाठी केवळ सरकारी विभागापूर्ती ही नोटीस मर्यादीत होती. पण, ती सार्वजनिक केल्याने सरकारची ही मोठी सायबर चूक मानली जात आहे.

या लॉगिन आयडी आणि पासवर्डच्या मदतीने कोणीही विभागाच्या अंतर्गत संकेतस्थळात प्रवेश करून माहिती पाहू किंवा डाऊनलोड करू शकतो. शिवाय लॉगिन आयडी आणि पासवर्ड देखील बदलू शकतो. अशी भीती सायबर आणि आयटी तज्ञांनी व्यक्त केली.

Goa Govt
CM Pramod Sawant: सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली त्याच जेलला भेट देत गोव्याच्या सीएमनी अर्पण केली श्रद्धांजली

दरम्यान, सरकारी विभागाची माहिती अतिशय संवेदनशील असून, अशा पद्धतीने सार्वजनिक न करता ती ई-मेलच्या मार्फत दिली पाहिजे असे सायबर तज्ञ सांगतात.

लॉगिन आयडी आणि पासवर्डची माहिती सार्वजनिक करणे ही मोठी घोडचूक असल्याचे विभागाने मान्य केले आहे. सायबर आणि डेटा नियमांचे हे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अनेक सरकारी विभागांचा कारभार डिजिटल झाला आहे. दरम्यान, 2019-20 साठीचा वार्षिक अहवाल मागवण्यासाठी विभागाचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड देण्यात आले होते. सोमवारपर्यंत अहवाल जमा करणे अपेक्षित होते. दरम्यान, लॉगिन आयडी आणि पासवर्डची माहिती सार्वजनिक केल्याने सरकारी विभागाच्या कारभारावर टीका होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com