Mapusa Market : म्हापसा मार्केटमधील फाटकास आक्षेप! व्यापारी आक्रमक

Mapusa Market : सर्वांच्या दृष्टीकोनातून फाटक खुले ठेवण्याबाबत एक निश्चित वेळ ठरवली जाईल. यासाठी सर्वांना विश्वासात घेतले जाईल.
Mapusa Market
Mapusa Market Dainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Market : म्हापसा येथील मार्केटमधील शकुंतलेच्या पुतळ्यासह इतरत्र उभारलेल्या लोखंडी फाटकाला म्हापसा व्यापाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला.

या फाटकामुळे साहित्य (माल) ने-आण करण्यास अडथळा निर्माण होण्यासोबतच गिऱ्हाईकांचा परिणाम होईल, असा दावा करीत या समस्येबाबत व्यापाऱ्यांनी आज शनिवारी उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्याजवळ कैफियत मांडली.

त्यामुळे हे फाटक हटविण्यासोबत दिवसभर फाटक व्यापाऱ्यांना मालाच्या वाहतूकीसाठी खुले ठेवण्याची मागणी केली. यावेळी नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष विराज फडके, मार्केट समितीचे चेअरमन नगरसेवक आशिर्वाद खोर्जुवेकर उपस्थित होते.

तसेच म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत, सचिव सिद्धेश राऊत, पांडुरंग सावंत, गिरीश केणी, वैभव, राऊळ, योगेश वझरकर, अमेय पोकळे व इतर व्यापारी उपस्थित होते. व्यापारी संघटनेचे सरचिटणीस सिद्धेश राऊत म्हणाले, लोकांच्या सोयीच्या उद्देशाने आम्ही बाजारात पे-पार्किंग करण्याची कल्पना दिली होती.

मात्र, आता कंत्राटदाराने प्रवेशद्वारच बंद केले. जोशुआ डिसोझा म्हणाले की, दिवसभर मार्केटमधील प्रवेशद्वार वाहनांसाठी खुले ठेवणे उचित ठरणार नाही. व्यापारी वर्गापूर्ताच हा विषय मर्यादित नसून इतरांचा विचार करणे माझी जबाबदारी आहे. सर्वांच्या दृष्टीकोनातून फाटक खुले ठेवण्याबाबत एक निश्चित वेळ ठरवली जाईल. यासाठी सर्वांना विश्वासात घेतले जाईल.

Mapusa Market
Goa Gramsabha: ग्रामसभा तापल्या! म्हार्दोळमधील जायांच्या बागायती वाचवणार कोण? फुलकार समाज संतप्त

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com