Goa Gramsabha: म्हार्दोळमधील जायांच्या बागायती बिल्डर लॉबीच्या सांगण्यावरून नष्ट करण्याचा घाट घातला जात असून, त्यामध्ये महामार्ग व जाई बागायतीजवळच बेकायदेशीरपणे थाटलेले सिमेंट ब्लॉक्स आस्थापन येत्या दोन दिवसांत पंचायतीने कार्यवाही करून हटवावे, तसेच जाई बागायती नष्ट करण्याचे जे सत्र सुरू आहे, त्याला पूर्णविराम द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली होती. याच विषयावरून आजची ग्रामसभा तापली.
मागील ग्रामसभेत स्वतः सरपंच हर्षा गावडे यांनीसुद्धा योग्य ती कार्यवाही करून ते बेकायदा आस्थापन हटविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते, परंतु आठवडा झाला तरी कोणतीच कार्यवाही न केल्यामुळे फुलकार समाजाने ग्रामपंचायतीवर शनिवारी धडक मोर्चा नेला होता.
कुर्टी-खांडेपारमध्ये स्मशानभूमीचा मुद्दा एरणीवर
कुर्टी-खांडेपार ग्रामसभेत स्मशानभूमीचा विषय गाजला. पंचायतीने सुमारे 16 हजार चौरस मीटर जमीन हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजासाठी आरक्षित केली असून अजून तिचे सीमांकन झालेले नाही.
धार्मिक सलोख्यात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी लवकरात लवकर तिन्ही स्मशानभूमींचे सीमांकन करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
गुहा नष्ट करणाऱ्यांवर 'एफआयआर'
वेरे-वाघुर्मे ग्रामसभेत शितोळे तळ्यावरील प्रस्तावित प्रकल्पाला लोकांचा विरोध कायम आहे. पांडवकालीन गुहा नष्ट करणाऱ्या कंत्राटदारावर एफआयआर नोंद करा, तसेच गावातील जलस्रोतांच्या सर्वेक्षणाची ग्रामस्थांनी मागणी केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.