Goa Assembly Monsoon Session : केक, वीड ब्राऊनीमधून ड्रग्जविक्री ; पेस्ट्री दुकानांची तपासणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

विरोधक : राज्यातील किती शाळा आणि महाविद्यालयांमध्‍ये ड्रग्‍ज सापडले, याबाबतची माहिती सभागृहात द्यावी.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Monsoon Session : राज्यातील काही केक शॉपमध्ये वीड ब्राऊनी आणि मारिजुआना केकद्वारे ड्रग्‍जची विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप ‘आप’चे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केला. दरम्‍यान, अशा पेस्ट्री दुकानांची अंमलीपदार्थविरोधी पथकांतर्फे तपासणी करून कारवाई केली जाईल व यासाठी नवीन पोलिस नियमावलीही बनवली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

कोणत्या पर्यटनस्थळांवर ड्रग्जच विक्री होते? असा सवाल आमदार वीरेश बोरकर यांनी विचारला होता. त्यावर व्हेंझी व्‍हिएगस यांनी पुरवणी प्रश्न विचारला. मुख्‍यमंत्री म्‍हणाले, राज्यातील कोणत्याही स्थळावर ड्रग्ज मिळत नाही. तसा कुठला हॉटस्पॉटही नाही.

खबऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर पोलिस, अंमलीपदार्थविरोधी पथक, गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडून संबंधितांवर कारवाई केली जाते. ड्रग्ज जप्त करून संशयितांना अटकही केली जाते.

‘त्या’ कॉलेजचे नाव वगळले

राज्यातील किती शाळा आणि महाविद्यालयांमध्‍ये ड्रग्‍ज सापडले, याबाबतची माहिती सभागृहात द्यावी अशी मागणी आमदार वीरेश बोरकर यांनी केली होती.

बांबोळी येथील कुजिरा कॉम्प्लेक्स परिसरात काळ्या काचांच्‍या कारमधून ड्रग्जविक्री होते, असा आरोप त्‍यांनी केला.

CM Pramod Sawant
Goa Assembly Monsoon Session : तरुणाई ऑनलाईन गेमिंगच्या फेऱ्यांत; बहुतांश कफ्‍फलकांची आत्‍महत्‍या

या परिसरातील एका महाविद्यालयाच्या वसतिगृहात ड्रग्‍ज सापडल्याची माहितीही दिली. या महाविद्यालयाची बदनामी नको म्हणून सभागृहाच्या कामकाजातून या महाविद्यालयाचे नाव वगळावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केल्याने सभापतींनी ते नाव वगळले.

गोव्याचे स्वतंत्र पोलिस मॅन्यूएल बनविणार

ड्रग्‍जबाबत हैदराबाद पोलिस महासंचालकांनी गोवा पोलिसांवर गंभीर आरोप केले होते, त्याचे काय झाले? असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी विचारला.

त्‍यावर मुख्‍यमंत्री म्‍हणाले, तीन महिन्यांपूर्वी सरकारने त्यांना लिखित पत्र पाठवले होते, मात्र अजून त्याचे उत्तर आलेले नाही.

इतर कोणत्याही राज्यातील पोलिसांना गोव्यात कारवाई करायची असल्यास त्यांनी गोवा पोलिसांचे सहकार्य घ्यावे हा गृह मंत्रालयाचा आदेश आहे.

गोव्यात पोलिस म्यान्यूएल नाही. त्यामुळेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांनाही पुन्हा पुन्हा जामीन मिळतो. मुंबई पोलिसांचे म्यान्यूएल लागू करण्याऐवजी गोव्याचे स्वतंत्र पोलिस मॅन्यूएल बनवले जाईल, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com