Mapusa Theft: म्हापशात रेकी करून एकाच रांगेतील पाच दुकाने फोडली, बाजारपेठेतील सुरक्षेवरून व्यापारी आक्रमक

Goa Crime: म्हापसा पालिका मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ३ एप्रिल) पहाटे चोरांनी एकाच रांगेतील पाच दुकानांचे शटर वाकवून आणि कुलूप तोडून रोख रकमेसह मौल्यवान ऐवज लंपास केला.
Mapusa Theft
Mapusa TheftDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: उत्तर गोव्यातील अत्यंत गजबजलेली बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या म्हापसा पालिका मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. ३ एप्रिल) पहाटे चोरांनी एकाच रांगेतील पाच दुकानांचे शटर वाकवून आणि कुलूप तोडून रोख रकमेसह मौल्यवान ऐवज लंपास केला. त्यासाठी त्यांनी आधी रेकी केल्याचे स्पष्ट झाले असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे चोरांनी अत्यंत नियोजनबद्धरित्या ही चोरी केली. यामध्ये प्रामुख्याने कॉस्मेटिक्स, डेकोरेशन साहित्य, डिस्पोजेबल वस्तू आणि कपड्यांच्या दुकानांना लक्ष्य केले. यात एका दुकानदाराचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Mapusa Theft
Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

चोरीची ही पद्धत पाहता, चोरांनी या परिसराची आधीच रेकी केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने सकाळी लवकर आलेल्या फिरत्या विक्रेत्यांच्या लक्षात ही बाब आली. दुकानांची तुटलेली कुलुपे पाहून त्यांनी तातडीने व्यापारी आणि पोलिसांना माहिती दिली. म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठेतील सुरक्षेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र फळारी म्हणाले, की लोकांच्या सुरक्षेबाबत केवळ घोषणा केल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही. वारंवार मागणी करूनही पालिकेला मार्केटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात अपयश आले आहे.

Mapusa Theft
Goa Job Scam: गोव्यात आणखी एक 'कॅश फॉर जॉब'? विदेशात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; 9 जणांची पोलिसांत तक्रार

पाच व्यापाऱ्यांनी दिली तक्रार...

या चोरीप्रकरणी एकूण पाच व्यापाऱ्यांनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. यामध्ये मुख्य तक्रारदार नितीन आरोलकर (खोर्ली) यांच्यासह अमजद मोहम्मद हुसेन कतवेलिया (खोर्ली), गौरेश साखळकर (धुळेर), मोहम्मद नासीर शेख (काणका) आणि इस्रार (बस्तोडा) यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com