Mapusa Market: म्हापसा बाजारपेठेच्या सुरक्षेसाठी पालिकेचा 'अ‍ॅक्शन प्लॅन' सज्ज, सीसीटीव्हीची नजर; रात्रीची गस्त, शिस्तबद्ध नियोजन

Mapusa Market Security Action Plan: ऐतिहासिक म्हापसा बाजारपेठेची सुरक्षितता आणि येथील वाढती गर्दी लक्षात घेऊन पालिकेने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सुरक्षेचा आराखडा तयार केला आहे.
Mapusa Market Security Action Plan
Mapusa Market Security Action PlanDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: ऐतिहासिक म्हापसा बाजारपेठेची सुरक्षितता आणि येथील वाढती गर्दी लक्षात घेऊन पालिकेने पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सुरक्षेचा आराखडा तयार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत चोरीच्या घटना आणि रात्रीच्या वेळी सुरक्षेचा अभाव याबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या.

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांच्या अध्यक्षतेखाली, पोलिस प्रशासन तसेच पालिका अधिकाऱ्यांसह एक महत्त्वाची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी म्हापसा पोलीस निरीक्षक नवीन देसाई, उपनगराध्यक्ष प्रकाश भिवशेट, मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर, नगरसेवक आदी उपस्थित होते.

Mapusa Market Security Action Plan
Goa Politics: केजरीवालांबाबत भाजपकडून दिशाभूल! वाल्मिकी नाईक यांची आमदार साळकर यांच्‍यावर टीका

बैठकीत प्रामुख्याने बाजारपेठेच्या तांत्रिक आणि मानवी सुरक्षा व्यवस्थेवर भर देण्यात आला. त्यानुसार, बाजारपेठेच्या प्रत्येक प्रवेश आणि निकास द्वारावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. ''इन्फो टेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा''च्या सहकार्याने हे काम प्राधान्यक्रमाने केले जाईल, ज्यामुळे गुन्हेगारी घटनांना आळा बसेल.

व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी पालिकेचे रिकामे गाळे भाड्याने देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. यामुळे व्यापाऱ्यांचे साहित्य सुरक्षित राहील.

Mapusa Market Security Action Plan
Goa Weather Update: निसर्गाचा दुहेरी खेळ: गोव्यात उष्णतेची लाट आणि पावसाचीही शक्यता, नागरिक हैराण

या त्रिसूत्री कार्यक्रमामुळे म्हापसा बाजारपेठ लवकरच अधिक सुरक्षित आणि सुव्यवस्थित दिसेल. व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी या नवीन नियमांना सहकार्य करावे. तसेच उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी खासदार निधीतून सीसीटीव्ही बसविण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

- नगराध्यक्ष प्रिया मिशाळ

सुरक्षा रक्षकही तैनात करणार

बाजारपेठेच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर असे स्पष्ट झाले की, रात्रीच्या वेळी बाजार परिसरात सुरक्षा रक्षकांची नितांत गरज आहे. त्यानुसार, ''गोवा मनुष्यबळ विकास महामंडळ''कडून अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात केले जातील. हे रक्षक म्हापसा पोलिसांच्या थेट समन्वयाने रात्रीची गस्त घालतील, अशी माहिती नगराध्यक्ष यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com