Mapusa Market: मुसळधार पावसाचा कहर! म्हापसा बाजारपेठ पाण्‍याखाली, व्यापाऱ्यांची उडाली धांदल

Goa Rain: सोमवारी संध्याकाळी पडलेल्‍या मुसळधार पावसामुळे म्हापसा शहरातील मुख्य बाजारपेठेतील सखल भाग जलमय झाले.
Mapusa Market
Mapusa MarketDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: सोमवारी संध्याकाळी पडलेल्‍या मुसळधार पावसामुळे म्हापसा शहरातील मुख्य बाजारपेठेतील सखल भाग जलमय झाले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने बाजारपेठेला अक्षरशः तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे व्यापारी, दुकानदार, ग्राहक आणि पादचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

संध्याकाळपासूनच म्हापसा पालिकेच्या मुख्य बाजारपेठेत पाणी साचण्यास सुरुवात झाली. विशेषतः ‘कॅफे कॉर्नर’ परिसरातील दोन्ही गल्ल्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला. तसेच केटीसी बसस्थानकाकडून बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या मार्गावरही पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

स्थानिक व्यापारी पांडुरंग सावंत यांनी याबाबत नाराजी व्यक्त करताना सांगितले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही नेहमीच्या ठिकाणी पाणी साचले. अव्यवस्थित रस्ते डांबरीकरण आणि पावसाळ्याच्या तोंडावर होणारी नालेसफाई यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.

Mapusa Market
Goa Illegal Mining Case: गोवा बेकायदेशीर खाणकाम प्रकरण: साळगावकर समूहाची 1023 कोटींची मालमत्ता जप्त

सलग एक तास अशाच स्वरूपाचा पाऊस सुरू राहिला, तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला. तसेच म्हापसा नगरपालिका आणि व्यापारी संघटनेने संयुक्तपणे कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.सामाजिक कार्यकर्ते शेखर नाईक यांनीही परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Mapusa Market
Mumbai Goa Highway Accident: नियंत्रण सुटलं अन् घात झाला! मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू, तिघे गंभीर जखमी

त्यांनी सांगितले की, बाजारपेठेत घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. सायंकाळी सहाच्या सुमारास साचलेले पाणी काही काळानंतर ओसरले होते. मात्र रात्री पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने बाजारपेठ पुन्हा एकदा पाण्याखाली गेली. पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना वारंवार अशा समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची टीकाही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com