Mapusa: ‘म्हापसा बंद’बाबत व्यापारी ठाम! शहरवासियांना सामील होण्याचे आवाहन, शिक्षण संस्था सुरू राहणार

Mapusa Market Closure: संबंधितांनी आमच्या समस्येचे निवारण केले नाही. किंबहुना ठोस आश्वासन मिळाले नाही. परिणामी, आमच्यासमोर म्हापसा शहर बंद ठेवण्यापासून दुसरा पर्याय नाही, असे स्पष्टीकरण फळारी यांनी दिले.
Mapusa city closure June 23
Mapusa city closure June 23Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: स्वच्छता शुल्काच्या नावाखाली म्हापसा पालिकेकडून व्यापारी आणि नागरिकांच्या लूटच्या निषेधार्थ म्हापसा व्यापारी संघटनेतर्फे २३ जून रोजी संपूर्ण मार्केट व म्हापसा शहर बंदची हाक दिली आहे. स्वेच्छेने तसेच शांततापूर्ण आमचे हे आंदोलन असणार, असे म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र फळारी यांनी स्पष्ट केले.

शुक्रवारी म्हापशात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जितेंद्र फळारी म्हणाले की, पुकारलेला म्हापसा बंद हा स्वेच्छेने आहे. तसेच आम्ही कुठल्याच शैक्षणिक संस्था तसेच अत्यावश्यक सेवांना आडकाठी आणणार नाही. शहरवासीयांना तसेच इतर व्यावसायिकांनी आमच्या या लढ्यात सहभागी होऊन या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

सध्या पालिकेने मनमानी कारभार चालवला आहे. यासंदर्भात आम्ही उपसभापती तथा स्थानिक आमदार जोशुआ डिसोझा, डीएमए व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भेटलो. तिथे आमचे म्हणणे मांडले, परंतु संबंधितांनी आमच्या समस्येचे निवारण केले नाही. किंबहुना ठोस आश्वासन मिळाले नाही. परिणामी, आमच्यासमोर म्हापसा शहर बंद ठेवण्यापासून दुसरा पर्याय नाही, असे स्पष्टीकरण फळारी यांनी दिले.

Mapusa city closure June 23
Mapusa: म्हापसा बाजारपेठेतील मार्केटच्या छताची दुरवस्था! काँक्रिट उखडले, तत्काळ दुरुस्तीची गरज

संघटनेचे सदस्य आशिष शिरोडकर यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांच्या सामान्य मागण्या आहेत. म्हापसा पालिका मंडळ सकारात्मकदृष्ट्या हा विषय सोडवू शकते. व्यापाऱ्यांच्या चार प्रमुख मागण्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याविषयी पालिका मंडळाने विशेष पालिका बैठक बोलावून, आमच्या मागण्यांच्या अजेंड्यावर चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली. या पत्रकार परिषदेवेळी सरचिटणीस सिद्धेश राऊत, श्रीपाद सावंत आदी हजर होते.

Mapusa city closure June 23
Mapusa: म्हापसा मार्केट बनले ‘चरण्याचे कुरण’! बेकायदा गोष्टींना चालना; पदपथांवर वाढले अतिक्रमण

व्यापाऱ्यांच्या चार मागण्या

मुळात जो स्वच्छता कर पाच वर्षांचा लागू केला आहे, तो एकाच वर्षाचा म्हणजे २०२५-२६ सालापासून लागू करावा.

व्यापाऱ्यांना स्वच्छता शुल्काचा जो श्रेणी दर लागू केला आहे, तो अयोग्य असून त्यात फेरबदल करावे.

ज्या व्यापाऱ्यांनी आतापर्यंत पाच वर्षांचा स्वच्छता शुल्क भरला आहे, त्यांचे चार वर्षांचे पैसे तत्काळ परत करावेत.

व्यापार परवान्याचे वेळीच नूतनीकरण न झाल्याने लागू होणारा उशिरा शुल्क माफ करावा,

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com