Mapusa: म्हापसा मार्केट बनले ‘चरण्याचे कुरण’! बेकायदा गोष्टींना चालना; पदपथांवर वाढले अतिक्रमण

Mapusa Market: उत्तर गोव्‍यातील सर्वांत मोठी आणि महत्त्‍वपूर्ण बाजारपेठ म्‍हणजे म्‍हापसा बाजारपेठ. परंतु गेल्‍या अनेक वर्षांपासून ही बाजारपेठ म्‍हापसा पालिका मंडळासाठी चरण्याचे कुरण बनले आहे.
Mapusa Market
Mapusa MarketDainik Gomantak
Published on
Updated on

बार्देश: उत्तर गोव्‍यातील सर्वांत मोठी आणि महत्त्‍वपूर्ण बाजारपेठ म्‍हणजे म्‍हापसा बाजारपेठ. परंतु गेल्‍या अनेक वर्षांपासून ही बाजारपेठ म्‍हापसा पालिका मंडळासाठी चरण्याचे कुरण बनले आहे. शहरासह या मार्केटमध्ये अनेक बेकायदा गोष्टींना चालना देण्याचा जणू सपाटाच पालिका मंडळाने लावला आहे, असे म्‍हटले तर ते वावगे ठरणार नाही.

प्रशस्त अशा या मार्केटमधील रस्ते पदविक्रेत्यांच्या माध्यमातून अडविणे, भरमसाठ विक्रेत्यांचा भरणा करून एक प्रकारे त्यांना जागा विकणे, या रस्त्यांवर गाळेवजा दुकाने थाटणे, अडविलेल्‍या पदपथांवर मालाचे प्रदर्शन करण्यास मुभा देत दुकानदारांच्या अतिक्रमणाला पाठबळ देणे, मॉडीफिकेशन करून दुकानांच्या मूळ रचनेत बदल करण्यास प्रोत्साहन देणे अशा अवैध गोष्टींना पालिका मंडळाने वाव दिला आहे.

या एकंदरीत प्रकाराला व्यापारी वर्गाची देखील तेवढीच साथ आहे. व्यापारीच बेकायदा गोष्टींना थारा देत असल्‍यामुळे पालिका मंडळही आपले हात ओले करत आहेत. पदपथांवर बसणारे बहुतांश विक्रेते पदपथांवरून आपले साहित्‍य, माल हटविण्यास तयार नाहीत. यांचे साहित्‍य आपल्‍या दुकानात ठेवून व दुकानासमोर बसू देण्याच्या नावाखाली अनेक दुकानदार भाडेपट्टी आकारतात. ही मिळकत बंद होण्याच्या भीतीपोटी दुकानदारांचा पदपथ विक्रेत्यांवर कारवाई करण्‍यास

विरोध आहे. भाजी मार्केट प्रकल्प उभारताना देखील नियोजनाचा अभाव दिसून आला. आपल्या मर्जीतील भाजीविक्रेत्यांचाच तेथे भरणा केलाय.

Mapusa Market
Mapusa FDA Raid: वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई! म्हापशात दीड टन केळी जप्त; पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर

मासळी मार्केटमध्‍ये भोंगळ कारभार

मासळी व भाजी मार्केट प्रकल्पांसह बाजारपेठेच्या विस्तारित इमारतींना डोळेझाकपणे परवानगी देण्‍यात आली आहे. सरकारच्या मदतीने उभारलेले मासळी मार्केट पंधरा वर्षांतच मोडकळीस आले. त्यानंतर उभारलेल्या मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांनाच बसायला जागा मिळालेली नाही. तेथे सांडपाण्याबाबत उपाययोजना नाही, मांसविक्रेत्यांचीही सोयीस्कर व्यवस्था नाही. दुसऱ्या मजल्याचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे.

Mapusa Market
Mapusa: म्हापशातील ‘ते’ जीर्ण घर जमीनदोस्त! पालिकेची कारवाई; नागरिकांचा सुटकेचा निश्वास

पदपथांवरील विक्रेते लागले हातपाय पसरू!

पदपथांवरील विक्रेत्यांनी दुकानदार व पालिका मंडळाच्या आशीर्वादाने आता शेड उभारण्यास सुरुवात केली आहे. म्हापसा बाजार ते ‘पॅराडाईझ’ फार्मसी आळीदरम्यान हा प्रकार चालला आहे. पूर्वी हे विक्रेते ऊन व पावसापासून संरक्षण मिळावे म्हणून छत्र्यांचा उपयोग करत असत. पण आता दुकानाच्या बाहेर अवैधरीत्या लोखंडी सळ्या टाकून शेड उभी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com