Mapusa lake : हणजूण तलावाची देखभालीअभावी दुर्दशा

Mapusa lake : त्याची देखभाल करण्यासाठी कोणीही काळजीवाहू नसल्यामुळे तेथे फिरायला जाणारे स्थानिक लोक वगळता पर्यटक नसणारे तलाव सध्या निर्जनस्थळात रुपांतरीत झाले आहे.
Mapusa lake
Mapusa lake Dainik Gomantak

Mapusa lake :

म्हापसा, एकेकाळी पर्यटकांचेच नव्हे, तर स्थानिकांचेही आकर्षणाचे केंद्रस्थान असलेले हणजूण तलाव सध्या दुर्लक्षित अवस्थेत पडून आहे. त्याची देखभाल करण्यासाठी कोणीही काळजीवाहू नसल्यामुळे तेथे फिरायला जाणारे स्थानिक लोक वगळता पर्यटक नसणारे तलाव सध्या निर्जनस्थळात रुपांतरीत झाले आहे.

हणजूणचे सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर म्हणाले की, पंचायतीने विनंती करूनही अद्याप तलावाच्या देखभालीचे काम हाती घेतलेले नाही.

पंचायत इमारतीजवळ असलेला हणजूण तलाव हा जलकुंभांपैकी आहे, जो गेल्या काही वर्षांत किमान तीनवेळा विकसित झाला आहे. मात्र, देखभालीअभावी कारंजे, पथदीप काम करत नसल्याने आणि तलावाच्या पाण्याचा रंग हिरवा झाल्याने हा परिसर निसर्जनस्थळ बनला आहे.

Mapusa lake
Goa Top News: दामोदराच्या सालात चोरी, श्रेया, नमिताला पोलिस कोठडी; राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा

उद्‍घाटनांतर काय झाले?

१ अनेक वर्षांपूर्वी जलस्त्रोत विभागाने हणजूण तलावाच्या सुधारणा व सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते आणि त्याचे उद्‍घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते ९ फेुब्रवारी २०१४ रोजी माजी जलस्त्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर यांच्या उपस्थितत सुमारे १.८ कोटी रुपये खर्चून केले होते.

२ पथदीप, बसण्यासाठी खुर्च्या, तलावातील तीन कारंजे याने संपूर्ण परिसर सुशोभित केला. सुशोभीकरणामुळे तलाव लवकरच गावातील प्रमुख आकर्षणांपैकी एक बनला. कारण पर्यटक व स्थानिक लोक सायंकाळच्या वेळी कारंजांचा आनंद लुटण्यासाठी येऊ लागले होते.

३ मात्र, वर्षानुवर्षे तलावाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या तुटल्या. कारंजे बंद पडले. एकापेक्षा जास्त कारंजे तलावात बुडाले.

४ याशिवाय रात्रीच्या वेळी पथदीपही पेटत नसल्याने या जागेचा वापर काहीजण दारू पिण्यासाठी करत आहेत. तलावाच्या कंपाउंड भिंतीलाही मोठ्या भेगा पडल्या असून ती कोसळण्याच्या मार्गावर आहे.

आजपर्यंत तलावाचा वर्षभरात तीनदा विकास झाला आहे. मात्र, देखभालीअभावी तलावाची दयनीय अवस्था झाली आहे. तलावाचे उद्‍घाटन झाले, तेव्हा पेडल बोटिंगची सुविधा सुरू करण्याचा प्रस्ताव मी मांडला होता. जेणेकरून उत्पन्नाचा वापर देखभालीसाठी करता येईल, पण काहीही झाले नाही.

- रमेश नाईक, अध्यक्ष, जैव विविधता समिती

तलाव जलस्त्रोत विभागाकडे असून देखभालीसाठी आम्ही त्यांना पंचायतीकडे हाताळण्यासाठी पत्र पाठवले होते. मात्र, जलस्रोत खाते काहीच हालचाल करत नाही. आम्ही आमदार तसेच जलस्त्रोत मंत्र्यांकडे तलावाचा प्रश्न मांडला आहे, परंतु काहीही झालेले नाही.

- लक्ष्मीदास चिमुलकर, सरपंच, हणजूण-कायसूव

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com