Mapusa: म्हापसा पालिकेच्या कारवाईवरून गोंधळ; हिंदूंना लक्ष्य केल्याचा आरोप; संघटना, दुकानदार आक्रमक

Mapusa Khorlim: घाटेश्वर नगर-खोर्ली येथील रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत गाळेवजा दुकानांवर मध्यंतरी म्हापसा पालिकेने कारवाई करीत, आठ दुकाने सीलबंद केली होती.
Mapusa News
Mapusa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: घाटेश्वर नगर-खोर्ली येथील रस्त्यालगत असलेल्या अनधिकृत गाळेवजा दुकानांवर मध्यंतरी म्हापसा पालिकेने कारवाई करीत, आठ दुकाने सीलबंद केली होती. मात्र, पालिकेकडून या कारवाईत भेदभाव झाला असून इतर १३ दुकानांना हात लावला गेला नाही.

पालिकेने निवडक कृती करून हिंदू समाजातील लोकांनाच लक्ष्य केले आहे, असा गंभीर आरोप करीत हिंदू संघटनेच्या विविध पदाधिकारी तसेच संबंधित सील केलेल्या गाळेवजा दुकानदारांनी सोमवारी (ता.८) म्हापसा पालिकेवर चाल केली. यावेळी निदर्शकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी तसेच पालिकेच्या नगराध्यक्षांची भेट घेत स्वतःची कैफियत मांडली. तसेच पालिकेकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने मोर्चेकरांनी माध्यमांसमोर आपली नाराजी बोलून दाखविली.

या चर्चेअंती मुख्याधिकाऱ्यांनी मोर्चेकरांच्या शिष्टमंडळास आश्वस्त केले की, पालिकेने कायद्याच्या चौकटीतच कारवाई केली आहे. रस्त्यालगत असलेल्या इतर दुकानांबाबत सध्या सुनावणी सुरू आहे. या प्रकरणातील सुनावण्या जलद गतीने घेऊन आवश्यक कारवाई पालिका करेल.

दरम्यान, हिंदू संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते की, पालिका जाणीवपूर्वक केवळ हिंदू समाजातील लोकांच्या गाळेवजा दुकानांना लक्ष्य करून स्थानिकांच्या पोटावर पाय देते.

Mapusa News
Ganesh Visarjan Mapusa: 'तो' देवदूतासाखा धावून आला! गणेश विसर्जनावेळी बुडणाऱ्या कर्नाटकच्या गणेशभक्ताला लाईफसेव्हरनं वाचवलं; म्हापसातील घटना VIDEO

इतर समाजाच्या लोकांच्या दुकानदारांना पालिकेकडून संरक्षण मिळत असल्याचा आरोप यावेळी संबंधित मोर्चेकऱ्यांनी केला.

यासंदर्भात बोलताना संतोष गावडे म्हणाले की, घाटेश्वर नगर-खोर्ली परिसरातील रस्त्यालगत माझ्या गाळेवजा दुकानास अनधिकृत जाहीर करून म्हापसा पालिकेने तत्काळ टाळे ठोकले. मात्र, इतर रस्त्यालगत असलेल्या दुसऱ्या समाजातील बेकायदा दुकानांकडे दुर्लक्ष केले आहे. हा भेदभाव नाही का? कायदा सर्वांना एकसमान असायला हवा; परंतु म्हापसा पालिका ही हिंदू व स्थानिकांच्या व्यवसायाला लक्ष्य करत आहे.

Mapusa News
Water Bill Dispute: पाणी बिल आले 83000, भरले 1500! कामुर्लीतील महिलेने दिला लढा; पाणी विभागाकडून चुकीची दुरुस्ती

सुनावणी सुरू

यावेळी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पालिकेत पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या घाटेश्वर नगर परिसरातील रस्त्यालगत २१ गाळेवजा दुकाने आहेत. त्यापैकी म्हापसा पालिकेने मध्यंतरी ८ दुकाने सीलबंद केली, तर उर्वरित १३ दुकानांच्या वैधतेबाबत सध्या मुख्याधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com