दहा वर्षे चाललेल्या खटल्यात सरकारी पक्षास अपयश, म्हापसा 'जेएमएफसी' न्यायालयाकडून पुराव्यांअभावी संशयिताची सुटका

Mapusa JMFC court acquittal: २०१६ मध्ये झालेल्या एका रस्ते अपघाताच्या खटल्यातून चालक राजा मणी (४४, कांदोळी) याची म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ‘डी’ न्यायालयाने (जेएमएफसी) निर्दोष मुक्तता केली आहे.
Court verdict
Court verdictDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: म्हापसा येथील मुंबई बसस्थानकावर २०१६ मध्ये झालेल्या एका रस्ते अपघाताच्या खटल्यातून चालक राजा मणी (४४, कांदोळी) याची म्हापसा येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ‘डी’ न्यायालयाने (जेएमएफसी) निर्दोष मुक्तता केली आहे. सुमारे दहा वर्षे चाललेल्या या कायदेशीर लढाईनंतर, पुराव्याअभावी न्यायालयाने हा निकाल दिला.

चालकावर आयपीसी कलम २७९ आणि ३३७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. १३ ऑक्टोबर २०१६ रोजी हा अपघात झाला होता. या प्रकरणातील मुख्य पंच साक्षीदार शिवानंद नावेलकर याने सरकारी पक्षाला सहकार्य केले नाही, ज्यामुळे घटनास्थळाचा पंचनामा आणि रेखाचित्र पुराव्यासाठी कमकुवत ठरले, असे निकालात नमूद केले आहे.

Court verdict
Goa Crime: कुटुंबीयांकडून घाईघाईत अंत्यविधीची तयारी, पण... KTC बस स्थानक परिसरात खळबळ; झोपडपट्टीत राहणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू

पीडित व्यक्ती दीप्ती बोंद्रे आणि प्रत्यक्षदर्शी म्हणून समोर आलेला वाहतूक पोलिस कर्मचारी सुनील भगत यांच्या जबानीमध्ये विसंगती आढळून आली. अपघाताच्या नेमक्या पद्धतीबाबत त्यांच्या विधानात स्पष्टता नव्हती, असे न्यायालयान स्पष्ट केले.

तसेच सरकारी पक्षाने ‘जीएमसी’चा अंतिम वैद्यकीय अहवाल सादर केला नाही. पीडित व्यक्तीने जबडा आणि हात-पाय मोडल्याचा दावा केला होता. मात्र, सुरवातीच्या वैद्यकीय दाखल्यात फक्त हनुवटीला इजा झाल्याची नोंद होती.

Court verdict
Goa SSC Recruitment: आनंदवार्ता...106 पदांसाठी कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू, सविस्तर माहिती वाचा

तांत्रिक चूक न्यायालयाकडून अधोरेखित

मोटार वाहन निरीक्षकाच्या अहवालात कारच्या डाव्या बाजूला नुकसान झाल्याचे म्हटले होते, तर सरकारी पक्षाच्या रेखाचित्रात वाहन उजव्या बाजूला गेल्याचे दर्शवले होते. ही तांत्रिक चूक न्यायालयाने अधोरेखित केली. परिणामी, न्यायालयाने राजा मणी याची कलम २५५(१) अंतर्गत मुक्तता केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com