

पणजी: एक महिन्याच्या अंतराने गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत सरकारी कर्मचाऱ्यांची तिसरी भरती सुरू केली आहे. यावर्षी आयोगाने प्राथमिक शिक्षकांची ३९० पदे आणि त्यानंतर पोलिस खात्यातील ७२२ पदांची भरती केली. त्यानंतर आयोगाने १०६ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात सर्वांत जास्त तलाठ्यांची ३० आणि ग्राम सचिवांची २६ पदे आहेत.
राज्य सरकारच्या वतीने सरकारी नोकऱ्या जाहीर केल्या जातात. त्यात पारदर्शकता रहावी, यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या गोवा कर्मचारी निवड आयोगामार्फत भरती प्रक्रिया राबविली जाते.
आता आयोगाने जी जाहिरात प्रसिद्ध केली आहे, त्यात ‘क’ श्रेणीतील १०६ पदे भरायची आहेत. त्यात सर्वाधिक ३० तलाठ्यांची पदे असून, या पदांसाठी इच्छुकांना आता संधी उपलब्ध झाली आहे. त्याच्याखालोखाल ग्रामपंचायत सचिवांची २६ पदे भरली जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी सीबीटी -१ नुसार २५ व २६ एप्रिल व २ मे आणि ३ मे रोजी परीक्षेचे आयोजन केले आहे. ई-ॲडमिट कार्ड १५ एप्रिल रोजी सीबीईएस पोर्टलवर उमेदवारांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध होणार आहे.
याशिवाय परीक्षेचे ठिकाण व परीक्षेची वेळ संकेतस्थळावर कळविली जाईल. सीबीटी परीक्षेला उपस्थित राहण्याकरिता उमेदवारांना आयोगाच्या संकेतस्थळावर सूचना पाहता येतील.
या पदांसाठी भरती
पद संख्या
तलाठी ३०
ग्रामसचिव २६
अव्वल कारकून १२
अकाऊंट्स क्लार्क १२
सर्चर १
माहिती साहाय्यक ६
औद्योगिक निरीक्षक १
निरीक्षक ५
स्टोअर किपर ४
ट्रेझरर (श्रेणी-३) ९
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.