Mapusa Sexual Assault Case: विकृत प्रवृत्ती ठेचून काढा! म्हापसा अत्याचारप्रकरणी मुख्‍यमंत्र्यांचे कठोर कारवाईचे आदेश

Mapusa four year old girl assault case: म्हापशात ४ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांना दिले आहेत.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: म्हापशात ४ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिसांना दिले आहेत. अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीला कायमचे गजाआड पाठवले पाहिजे, असे संतप्त उद्‌गारही त्‍यांनी काढले.

संपूर्ण राज्‍य दिवाळीच्या आनंदात मग्न असताना माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना रविवारी रात्री घडली. म्‍हापशातील डॉ. राम मनोहर लोहिया उद्यानासमोरील एका निर्जन व पडक्या इमारतीत चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

‘‘या घृणास्पद कृत्याचा मी निषेध करतो. अशा मनोवृत्तीच्या व्यक्तींना समाजात स्थान असता कामा नये. पोलिस या प्रकरणी कठोरातील कठोर कारवाई करतील आणि संशयिताला कायमचे गजाआड पाठवतील’’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

CM Pramod Sawant
Indian Super League: 'आयएसएल' पंचगिरीबाबत FC Goa नाराज, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडे लेखी तक्रार; तीव्र चिंता व्यक्त

या घटनेनंतर कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावरून सरकार आणि पोलिसांवर समाजमाध्यमांवर जोरदार टीका होत आहे. गजबजलेल्या ठिकाणीही अशा घटना घडत असतील तर निर्जन ठिकाणी काय परिस्थिती असेल, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

बालहक्क आयोगाकडून गंभीर दखल

गोवा राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेत स्वतःहून चौकशी सुरू केली आहे. तसेच पोलिस यंत्रणेला सखोल, निष्पक्ष आणि कालमर्यादेत तपास करण्याचे निर्देश दिले आहेत. बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो), २०१२ आणि अन्य लागू कायद्यांनुसार संशयिताविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

पोलिसांची अनेक पथके तैनात : अधीक्षक गुप्ता

संशयिताच्या शोधासाठी अनेक पोलिस पथके कार्यरत असून, सुमारे ४० कर्मचारी तपासात सहभागी आहेत. काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. त्यातून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली जात आहे, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.

काही संशयित ताब्‍यात; कसून चौकशी सुरू

पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले जात असल्‍याचे अधीक्षक गुप्ता यांनी सांगितले. या प्रकरणात अपहरण आणि लैंगिक अत्याचारासह विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्‍यात आला आहे असे सांगून पीडित बालिकेची प्रकृती स्थिर असल्याचे गुप्‍ता यांनी स्‍पष्‍ट केले.

फुगेविक्रेता बाप दारू पिऊन झोपी गेला अन्‌...

पीडित चिमुरडीचे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील असून दिवाळीच्या सणात फुगे विकण्यासाठी ते गोव्यात आले होते. पीडित बालिका आणि तिचे वडील म्हापसा येथे होते, तर तिची आई आणि इतर भावंडे कळंगुट भागात फुगे विकत होती. काल दिवाळीच्या रात्री बाजार बंद झाल्यानंतर मुलीचे वडील मद्यप्राशन करून झोपी गेले. आरोपीने हिच संधी साधून बालिकेचे अपहरण केले. पोलिसांनी प्रत्यक्ष येऊन झोपेतून उठवल्यानंतरच वडिलांना या धक्कादायक घटनेची माहिती मिळाली.

CM Pramod Sawant
Palolem Beach Goa: पाळोळे बीचचा जगभर डंका! जगातील टॉप 25 समुद्रकिनाऱ्यांमध्ये पटकावलं सहावं स्थान; आशियातील ठरला नंबर वन बीच

संतापाचा उद्रेक; पोलिस स्‍थानकावर धडक : या घृणास्‍पद कृत्‍याचा सर्व थरांतून निषेध करण्‍यात येत आहे. संतप्‍त म्‍हापसावासीयांनी सोमवारी संध्‍याकाळी म्‍हापसा पोलिस स्‍थानकावर धडक देऊन आरोपीला ४८ तासांत अटक करण्‍याची मागणी केली. दिलेल्‍या मुदतीत पोलिसांच्‍या तपासाला यश आले नाही तर आंदोलन तीव्र करण्‍याचा इशाराही त्‍यांनी दिला. दरम्‍यान, त्‍यापूर्वी काँग्रेसच्‍या कार्यकर्त्यांनीही पोलिस स्‍थानकावर धाव घेऊन तेथील कर्मचाऱ्यांवर प्रश्‍‍नांची सरबत्ती केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.